
शहरात सध्या विविध ठिकाणी शासनाने दिलेल्या शंभर कोटींच्या निधीतून अनेक रस्त्यांची कामे सुरु आहेत. मात्र, कंत्राटदाराच्या मनमानीने नागरिक त्रस्त झालेले आहेत.
औरंगाबाद : शहरात रस्त्याच्या कामातील अडथळे हटविण्यासाठी कंत्राटदार टाळाटाळ करीत आहेत. महापालिकेलाही त्याचे देणेघेणे नाही. मात्र, वाहतूक कोंडी लक्षात घेता वाहतूक पोलिसच पुढे सरसावले आहेत. चार दिवसांपूर्वी आझाद चौकात वाहतूक पोलिसानेच पुढाकार घेत रस्त्यातील अडथळे दूर करुन वाहनधारकांना दिलासा दिला.
शहरात सध्या विविध ठिकाणी शासनाने दिलेल्या शंभर कोटींच्या निधीतून अनेक रस्त्यांची कामे सुरु आहेत. मात्र, कंत्राटदाराच्या मनमानीने नागरिक त्रस्त झालेले आहेत. रस्त्याचे काम करताना, वाहतुकीचा विचार करण्याऐवजी बाजूच्या रस्त्यांमध्ये अडथळे टाकण्यात कंत्राटदार धन्यता मानत आहेत.
अरेरे - पतंग काढताना 14 वर्षीय मुलाचा मृत्यू
मुळात रस्त्याचे काम सुरु असताना बाजूने वाहतुक सुरळीत रहावी यासाठी अडथळे हटवणे, तयार झालेल्या रस्त्याच्या दुतर्फा मुरुम टाकून रस्ता आणि जमीन समांतर करणे हे काम कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे. कंत्राटदाराकडून ही कामे करुन घेणे महापालिकेचे काम आहे. मात्र महापालिका त्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहे, त्या ठिकाणी बाजूच्या रस्त्यातील अडथळ्यांमुळे वाहतूक कोंडीचा सातत्याने सामना करावा लागत आहे.
पोलिसांनीच घेतला पुढाकार
रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी कंत्राटदाराने न काढलेले अडथळे काढण्यासाठी वाहतूक पोलिस स्वत: लक्ष घालून नागरीकांच्या मदतीने अडथळे काढत असल्याचे चित्र सातत्याने दिसत आहे. आझाद चौकात रस्त्याच्या कामादरम्यान कंत्राटदाराने कुठलेही अडथळे काढले नाही,
बाप रे - बायकोचा विळ्याने चिरला गळा
दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या कामानंतर मुरुम तसाच टाकून दिला. त्यामुळे बुधवारी (ता. 27) शहर वाहतुक पोलिसानेच स्व:ता दगड विटा गोळा करुन दोन रस्त्यातील खड्डे भरुन काढले. एका व्यक्तीच्या मदतीने मातीचे ढिग दुर केले. हे काम वाहतुक पोलिस निष्ठेने करत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचे कौतुक तर केलेच, शिवाय धन्यवादही दिले.