पोलिसांमुळे विद्यार्थ्याला मिळाली रिक्षात विसरलेली बॅग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

औरंगाबाद - वाळूजला नातेवाईकांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्याची रिक्षात विसरलेली बॅग वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांमुळे काही तासांतच मिळाली. विद्यार्थ्याला सोमवारी (ता. 12) ही बॅग वाहतूक पोलिसांनी परत केली.

औरंगाबाद - वाळूजला नातेवाईकांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्याची रिक्षात विसरलेली बॅग वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांमुळे काही तासांतच मिळाली. विद्यार्थ्याला सोमवारी (ता. 12) ही बॅग वाहतूक पोलिसांनी परत केली.

गोविंद सर्जेराव टार्फे (रा. सिडको, एन- नऊ, संत गाडगेबाबा वसतिगृह) हा हिंगोली येथून शहरात बसने आला. सिडको बसस्थानकातून नातेवाईकाकडे वाळूजला जाण्यासाठी रिक्षात बसला व महावीर चौकात उतरला; पण रिक्षात त्याची बॅग विसरली. वाळूजला जाणाऱ्या रिक्षात बसल्यानंतर त्याला ही बाब लक्षात आली. त्यानंतर तो महावीर चौक येथील वाहतूक पोलिस चौकीत गेला. चौकीतील पोलिसांना बॅग विसरल्याचे सांगितल्यानंतर सहायक फौजदार रामदास सुरे, जमादार दिलीप लकेकर, वेदांतनगर पोलिस चौकीचे माणिक नागरे यांनी शोध सुरू केला. महावीरचौक ते सिडको बसस्थानकादरम्यान वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना विचारपूस केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर एका रिक्षाचालकाने प्रवाशाची बॅग विसरल्याचे सांगत बॅग पोलिसांकडे परत केली. ही बॅग गोविंदला सुपूर्द केली.

Web Title: Police student had to struggle to Bag