बीडमध्ये पोलिस कर्मचारी निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

बीड - गोपनीय कारवाईची माहिती लीक केल्याचे उघडकीस आल्यावरून एका पोलिस कर्मचाऱ्यावर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुरुवारी (ता. 5) निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणात सदर कर्मचाऱ्याला सहकार्य केल्याप्रकरणी अन्य एका कर्मचाऱ्याची रवानगी पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकातून पोलिस मुख्यालयात केली आहे.

शिवदास घोलप असे निलंबित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, अनंत गिरी यांची रवानगी मुख्यालयात केली आहे. काही दिवसांपूर्वी शिरूर तालुक्‍यात नर्तिका नाचविणाऱ्यावरून वाद झाला होता. गावातील काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. यात आरोपींना ताब्यात घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले होते. येथे कारवाई चालू असतानाच यातील ओळखीच्या आरोपींना सोडण्यासाठी घोलप यांनी हस्तक्षेप केला. शिवाय अंतर्गत माहिती बाहेर सांगितली होती. 

Web Title: Police Suspend in beed