Gram Panchayat Election : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पोलिस सज्ज ; 89 ग्रामपंचायती संवेदनशील, रुटमार्चद्वारे पोलिसांचे शक्तीप्रदर्शन

गणेश पांडे 
Tuesday, 12 January 2021

जिल्ह्यातील 9 तालुक्यातील एकूण 566 ग्रामपंचायती असून 67 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे 499 ग्रामपंचायतीच्या एकूण 1 हजार 582 बुथवर मतदान होणार आहे.

परभणी : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील 499 ग्रामपंचायतीपैकी 89 ग्रामपंचायत संवेदनशील असून त्या ठिकाणी पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी रुट मार्च करून शक्ती प्रदर्शन घडविले. प्रत्येक ठिकाणी शांतता कमिटीची बैठक घेवून लोकांना शांततेचे आवाहन देखील केले.

मराठवाड्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

जिल्ह्यातील 9 तालुक्यातील एकूण 566 ग्रामपंचायती असून 67 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे 499 ग्रामपंचायतीच्या एकूण 1 हजार 582 बुथवर मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे परभणी पोलिस दलाने जय्यत तयारी केली आहे. सर्व गावांना भेटी दिल्या आहेत. त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कायदा व सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. तसेच गटा-तटाच्या राजकारणावरून ताणतणाव निर्माण होवू नये, म्हणून प्रत्येक गावात शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या. सदर बैठकांना उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले आहे. 499 ग्रामपंचायतीपैकी 89 ग्रामपंचायती संवेदनशील असून या गावांना उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठका घेतल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

संवेदनशील गावात रुटमार्च

जिल्ह्यातील मोठ्या व संवेदनशील 89 गावात सोमवारी रुट मार्च घेवून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. 1 उप अधिक्षक, प्रभारी पोलिस उपाधिक्षक 5, पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी 17, दुय्यम अधिकारी 116, पोलिस कर्मचारी 1200 असा जिल्ह्यातील पोलिसांचा बंदोबस्त आहे. त्याचबरोबर बाहेर जिल्ह्यातील अमरावतीचे 100 पोलिस कर्मचारी, औरंगाबादचे 300 पोलिस कर्मचारी व राज्य राखीव दलाची 1 कंपनी, 1 सेक्शन, तसेच 750 होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

85 सेक्टरची निर्मितीद्वारे बंदोबस्तावर लक्ष

जिल्ह्यात बंदोबस्ताचे नियोजन करताना प्रत्येक गावाला भेट देण्यासाठी सेक्टरची निर्मिती केली असून प्रत्येक सेक्टरमध्ये 6 ते 7 गावांचा समावेश आहे. असे जिल्ह्यात 85 सेक्टरची निर्मिती केली असून त्यांना मनुष्यबळ अद्यावत वाहन, वायरलेस व ध्वनीक्षेपक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच संवेदनशील व मोठ्या गावातील निवडणूक बुथवर सीसीटिव्हीची देखरेख राहणार आहे.
- जयंतकुमार मीना, पोलिस अधिक्षक, परभणी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The police system is ready for the Gram Panchayat elections in Parbhani district