विनाहेल्मेट स्वारांविरुद्ध पोलिसांची मोहीम जोरात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार विनाहेल्मेट दुचाकीस्वारांविरुद्ध पुन्हा जोरात मोहीम राबविण्यात आली आहे. मागील दहा दिवसांत पाचशे रुपयेप्रमाणे दंड आकारून पोलिस विभागाने 161 दुचाकीस्वारांकडून ऐंशी हजार रुपये दंड वसूल केला. 

फेब्रुवारी महिन्यात हेल्मेट सक्तीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पोलिस विभागाने सुरवातीला मोठी मोहीम राबविली. पण त्यानंतर कारवाईला मरगळ आली होती. एक वर्षानंतर पुन्हा पोलिस आयुक्तांनी हेल्मेट सक्तीसाठी पावले उचलली आहेत. ही मोहीम जोरदारपणे राबविण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी (ता. 10) वाहतूक शाखेला दिले आहेत. 

विनाहेल्मेट दुचाकीस्वार आढळल्यास त्यांच्याकडून पाचशे रुपयेपर्यंत दंड आकारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. अवैध व बेशिस्त रिक्षाचालकांवर गत दहा दिवसांपासून कारवाई सुरू आहे. यात दिवसा वाहतूक पोलिस व रात्रीच्यावेळी चार्ली पोलिस कारवाया करीत आहेत. चालकाशेजारी प्रवासी बसवणे, जादा प्रवासी बसवणे, अशा बाबींसाठी रिक्षांवर कारवाई सुरू आहे. दोन ते दहा फेब्रुवारीपर्यंत पोलिसांनी साडेपाचशे रिक्षांवर कारवाई केल्याची माहिती अमितेशकुमार यांनी दिली. 

ट्रॅक्‍टरवरबाबतही सूचना 
ट्रॅक्‍टरला शहरात प्रवेशबंदी आहे; पण तरीही ट्रॅक्‍टरद्वारे वाहतूक होते. ट्रॅक्‍टरमुळे अपघाताची शक्‍यता असल्याचे सांगत आयुक्तांनी धोकादायकपणे वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरवर कारवाईचा इशारा दिला असून ही मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक विभागाला दिल्या. 

वाहतूक पाहिल्यानंतर समजले! 

पोलिस आयुक्त कारने जिल्हाधिकारी कार्यालय- टीव्ही सेंटर भागात गेले होते. त्यावेळी या भागातून जाणारे दुचाकीस्वार हेल्मेट घालत नसल्याचे त्यांना समजले. त्यामुळे हेल्मेटविरुद्ध कारवाई करावी लागणार ही बाब त्यांना उमगली व शुक्रवारी कारवाईच्या सूचना त्यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांना दिल्या. 

Web Title: Police take action on Without Helmet