पाच हजारांची लाच घेताना पोलिस नाईक चतुर्भुज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

तक्रारदाराने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना औरंगाबाद विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बनोटी दूरक्षेत्राचा पोलिस नाईक प्रदीप देवचंद पवार (बक्कल क्रमांक 915) यास पकडण्यात आले. त्याल अटक करण्यात आली आहे.

सोयगाव (जि.औरंगाबाद) ः तक्रारदाराने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना औरंगाबाद विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बनोटी दूरक्षेत्राचा पोलिस नाईक प्रदीप देवचंद पवार (बक्कल क्रमांक 915) यास पकडण्यात आले. त्याल अटक करण्यात आली आहे.

पहुरी (ता. सोयगाव) येथील एका घटनेत दाखल गुन्ह्यात प्रवीण रामलाल गुजर (वय 40) यांना प्रदीप पवार याच्याकडून सतत पाच हजार रुपयांची मागणी केली जात होती. प्रवीण गुजर यांच्या तक्रारीवरून गोंदेगाव भागात सोमवारी दुपारी सापळा रचून प्रदीप पवार यास पकडून अटक करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सोयगाव पोलिस ठाण्यात या पोलिसाची चौकशी करण्यात येत होती. औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलिस अधीक्षक अनिता जमादार, पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, गणेश पंडुरे, गोपाल बरंडवाल, रवींद्र देशमुख, अरुण उगले, वाहनचालक चंद्रकांत शिंदे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Traped Into Bribe