ईमारतीच्या टेरेसवरून पोलिसांची टेहळणी

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 24 जुलै 2018

दुकानाच्या छतावर जाऊन पत्रा कापून चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याने इतवारा पोलिसांनी आता उंच ईमारतीवरून दुर्बीन व बॅटरीचा आधार घेत रात्रीची टेहळणी सुरू केली आहे. या हद्दीतील कापडाच्या बाजापेठेत लगातार चोऱ्या झाल्याने हा उपक्रम सुरू केला असल्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी सांगितले.

नांदेड : दुकानाच्या छतावर जाऊन पत्रा कापून चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याने इतवारा पोलिसांनी आता उंच ईमारतीवरून दुर्बीन व बॅटरीचा आधार घेत रात्रीची टेहळणी सुरू केली आहे. या हद्दीतील कापडाच्या बाजापेठेत लगातार चोऱ्या झाल्याने हा उपक्रम सुरू केला असल्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी सांगितले.

इतवारा ठाण्याच्या हद्दीत मागील आठवड्यात लगातार अज्ञात चोरट्यांनी कापड दुकानाच्या छतावर जावून पत्रा कापून दुकानात प्रवेश करत लाखोंचा एेवज लंपास केला होता. चोरट्यांची चोरी करण्याची एकच पध्दत असल्याने या परिसारतील सर्व चोऱ्या याच पध्दतीने झाल्या. यानंतर व्यापाऱ्यांनी पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांची भेट घेऊन होणाऱ्या चोऱ्यांवर प्रतिबंध घालण्याचे आवाहन केले होते. तसेच झालेल्या चोरींच्या घटनांचा तपास लवकर लावावा आणि भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

पोलिस अधिक्षक मीना यांनी यानंतर पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांना सुचना दिल्या. यावरून स्वत: नरवाडे, फौजदार नंदकिशोर साोळंके यांच्यासह 25 कर्मचारी हे रात्री बारा ते चार या वेळेत उंच इमारतीच्या टेरेसवरून टेहळणी करीत आहेत. सशस्त्र पोलिसांच्या डोळ्यासमोर दुर्बीण आणि हातात बॅटरी असल्याने सध्या तरी पोलिसांची टेहळणी शहरात चर्चेचा विषय बनली आहे. रात्रभर पोलिसांची गस्त सुरू असल्याने व्यापारी व नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

Web Title: Police Watch on the terrace of the building