राजकारणाची चौकट घसरत चालली - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

अंबाजोगाई - राज्यात सध्या महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. परंतु या निवडणुकांत विकासाचा अजेंडा कुठेच दिसत नाही. नियोजनाच्या बाबतीत कुठेच विचार होत नाही. अशा परिस्थितीत राजकारणाची चौकट घसरत असल्याची खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी (ता.12) येथे पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली. 

खासदार सुळे जिल्हा परिषद निवडणूक प्रचारानिमित्त परभणीकडे जात होत्या. यानिमित्त अक्षय मुंदडा यांच्या "आई' या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. खासदार सुळे म्हणाल्या, सर्वच जण जिंकण्यासाठी निवडणूक लढतात. परंतु त्यासाठी नियोजन व विकासाचा अजेंडा असला पाहिजे. पण हे चित्र आज बदलत चालले आहे. यावर सर्व पक्षांची आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत बोलतानाही निवडणुकीच्या मूडमध्येच बोलतात. ते पंतप्रधान म्हणून कधी दिसतील हे आम्ही पाहत आहोत. त्यांनी राबविलेला विविध योजनांचा अजेंडा चांगला आहे. परंतु त्यावर अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचेही त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. हे सरकारचे अपयश असल्याची टीका त्यांनी या वेळी केली. अक्षय मुंदडा, नमिता मुंदडा, शेख रहिम, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी व डॉ. नरेंद्र काळे यांची याप्रसंगी उपस्थिती होती. 

Web Title: political framework fall