विधिवत पूजन व आरतीने अंबाजोगाईच्या योगेश्वरीदेवी मंदिरात घटस्थापना

Pooja in Yogeshwari Devi Temple in Ambejogai
Pooja in Yogeshwari Devi Temple in Ambejogai

अंबाजोगाई (जि. बीड) : कोकणस्थांची कुलदेवता, अंबाजोगाईकरांची ग्रामदेवता व  राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी मंदिरात बुधवारी (ता. 10) सकाळी घटस्थापना होऊन नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला. 

देवल समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष रूईकर यांच्या हस्ते सपत्नीक वर्णी देऊन घटस्थापना झाली. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात पूजेचे विधी झाले. याप्रसंगी देवल समितीचे विश्वस्त भगवानराव शिंदे, प्रथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, अॅड. शरद लोमटे, गिरिधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, संजय भोसले, गौरी जोशी, पूजा कुलकर्णी यांच्यासह भक्तांची उपस्थिती होती. 

यानिमित्ताने मंदिरात देविच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगाही लागल्या होत्या. मंदिराच्या गाभाऱ्यात पूजा होईपर्यंत दर्शन रांगा थांबविण्यात आल्या होत्या. पूजेचे विधी झाल्यानंतर दर्शनाला सुरवात झाली. 

भजन व सांस्कृतिक कार्यक्रम-
दुपारी 12 पासून महिला मंडळांच्या भजनाच्या कार्यक्रमांनाही प्रारंभ झाला. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत महिलांचे भजन, संगीत व गायन कार्यक्रम, किर्तन, प्रवचन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com