खासदार हेमंत पाटलांना मिळणार मंत्री पद?

मंगेश शेवाळकर
मंगळवार, 28 मे 2019

मतदारांची उत्सूकता शिगेला, मागास जिल्ह्याचा शिक्का पुसला जाणार

हिंगोली : मराठवाड्यात सर्वात जास्त मतांनी विजयी झालेले शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांना मंत्री पद मिळणार का याची उत्सूकता मतदारांनी लागली आहे. या भागातील विकासासाठी मंत्रीपद मिळणे आवश्यक असल्याने मतदारांचे डोळे दिल्लीकडे लागले आहेत. मंत्रीपद मिळाल्यास हिंगोलीचा मागस जिल्ह्याचा शिक्का पुसला जाणार आहे. 

मतदारांची उत्सूकता शिगेला, मागास जिल्ह्याचा शिक्का पुसला जाणार

हिंगोली : मराठवाड्यात सर्वात जास्त मतांनी विजयी झालेले शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांना मंत्री पद मिळणार का याची उत्सूकता मतदारांनी लागली आहे. या भागातील विकासासाठी मंत्रीपद मिळणे आवश्यक असल्याने मतदारांचे डोळे दिल्लीकडे लागले आहेत. मंत्रीपद मिळाल्यास हिंगोलीचा मागस जिल्ह्याचा शिक्का पुसला जाणार आहे. 

हिंगोली लोकसभा निवडणुकीत यावर्षी शिवसेनेचे हेमंत पाटील यांच्या  विरोधात बाहेरचा उमेदवार म्हणून प्रचार झाला होता. मात्र विरोधकांकडून होणाऱ्या टिकेकडे दुर्लक्ष करून युतीच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेत प्रचाराचे योग्य नियोजन केल्याने खासदार पाटील तब्बल पावने तीन लाख मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. आतापर्यंतच्या हिंगोली लोकसभा निवडणुकीतील सर्वात जास्त आघाडी आहे. यापुर्वीच्या बहुतांश निवडणुकांमधे विजयी उमेदवारांनी ८० ते ९० हजार मतांनी विजय 
मिळविले आहेत. 

दरम्यान, हिंगोली जिल्हा मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जातो.  या भागात विकास कामे होणे आवश्यक आहे. आज पर्यंतच्या अनेक  निवडणुकांमधून ज्या पक्षाचे सरकार असेल त्याच्या विरोधी उमेदवार  विजयी झाल्याचा इतिहास मतदार संघाला आहे. मात्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर लोकसभा मतदार संघाचा विकास होईल या अपेक्षेने मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात भरभरून मतदान टाकले आहे. त्यामुळे आता या भागाच्या विकासाची जबाबदारी खासदार हेमंत पाटील यांच्यावर आली आहे. 

या शिवाय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची  मातोश्रीवर जाऊन  खासदार पाटील यांनी भेट दिली. मराठवाडयात शिवसेनेचा सर्वात  जास्त मतांनी विजयी झालेला खासदार म्हणून ठाकरे  यांनी खासदार पाटील यांची पाठ थोपटली आहे. त्यामुळे केंद्राच्या मंत्रीमंडळात खासदार पाटील यांनी किमान राज्यमंत्री म्हणून वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सर्वसामान्य शिवसैनिक, आमदार व आता खासदार म्हणून विजयी झालेल्या पाटील यांचा अनुभव लक्षात घेता त्यांची मंत्री मंडळात वर्णी लागणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. त्यांना मंत्रीपद मिळाल्यास 
लोकसभा मतदार संघाचा विकास होऊन हिंगोली जिल्हयावर असलेला मागास जिल्ह्याचा शिक्का कायम स्वरुपी पुसल्या जाईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मतदारांमधे उत्सूकता निर्माण झाली असून मतदारांचे डोळे मुंबईत मातोश्रीकडे तसेच दिल्लीकडे लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: possibility to get ministry to Hemant Patil