निसर्ग पावला; पण महावितरण कोपले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

बीड - चार वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा भरपूर पाऊस झाला. कायम कोरडेठाक राहणाऱ्या जलस्रोतात मुबलक पाणी आले. पण, वीजपुरवठ्याअभावी पिके करपून जात आहेत. जळालेल्या रोहित्रांची ने - आण करण्याची बाजू पेलूनही अधिकाऱ्यांचे हात ओले केल्याशिवाय रोहित्र भेटत नाहीत. भेटलेले रोहित्रही जळालेलेच असल्याचे प्रकारही समोर येत आहेत. एकूणच निसर्गाने तारले आणि महावितरणने मारले असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पण, याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. 

शेतकऱ्यांना अधिकारी लुटत आहेत; तर रोहित्रांची दुरुस्ती करणारे ठेकेदार महावितरणाला लुटत आहेत. मात्र, या लुटालुटीत नुकसान केवळ शेतकऱ्यांचे होत आहे. अद्यापही जिल्ह्यातील 93 रोहित्र जळालेले असून, अनेक ठिकाणी बिघाडामुळे शेतात वीजपुरवठा नाही. 

चार वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा परतीचा पाऊस भरपूर झाला. कायम कोरडेठाक असणारे साठवण तलाव, लघु प्रकार पाण्याने भरले असून, नद्याही प्रवाहित आहेत. शेतातील विंधन विहिरी आणि विहिरींनाही चांगले पाणी आहे. दरम्यान, यंदा चांगला पाऊस झाल्याने रब्बी पिके चांगली येतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण, महावितरणचा भोंगळ कारभार आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने शेतकऱ्यांच्या आशा पुरत्या मावळल्या आहेत. रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, कपाशी ही पिके जोमात आली. पण, अनेक ठिकाणी जळालेले रोहित्र आणि वीजपुरवठ्यात झालेला बिघाड दुरुस्त व्हायला महिना उलटत आहे. त्यामुळे पिके करपू लागली आहेत. जळालेल्या रोहित्रांची चढ-उतार करणे, ने-आण करणे याचा खर्च करूनही पुन्हा अधिकाऱ्यांचे हात ओले केल्याशिवाय रोहित्र भेटत नाही, हे आजचे वास्तव आहे. मात्र, दुरुस्त भेटलेले रोहित्रही जळालेलेच असते हेही सत्य आहे. त्यामुळे अगोदरच दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांचा खिसा रिकामा होऊनही हाती काहीच लागत नाही. 

सांगता येईना अन्‌ सहनही होईना 
बिघाड किंवा जळालेल्या रोहित्रामुळे शेतीपंपांना वीज नसते. परिणामी, रब्बी पिके हातची जाऊ नयेत म्हणून शेतकरी सुरवातीला लोकप्रतिनिधींकडे चकरा मारतात. पण, काही उपयोग होत नसल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांना गाठावे लागतात. अशा वेळी बिघाड झालेल्या वीज साहित्याच्या खरेदीचा खर्चही शेतकऱ्यांच्या माथी पडतो.

Web Title: Power supply problem