पथदिवे, पाण्याचा वीजपुरवठा होणार खंडीत

Mahavitaran
Mahavitaran

नांदेड : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम महावितरण हाती घेणार आहे. ग्रामपंचायतींना त्वरीत वीजदेयक भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीकडे असलेल्या दोन हजार २० पाणीपुरवठा योजनांची १०७ कोटी ९६ लक्ष रुपयांची थकबाकी आहे.  यामध्ये भोकर विभागातील ७८३ योजनांकडे २५ कोटी २२ लक्ष रुपये, देगलूर विभागाकडे पाणीपुरवठा योजनांची ४७ कोटी ४८ लक्ष रुपये, नांदेड ग्रामिण विभागातील ५२६ योजनांकडे ३२ कोटी ७२ लक्ष रुपये तर नांदेड शहर विभागांतर्गत येणा-या ७० पाणीपुरवठा योजनांकडे दोन कोटी ५४ लक्ष रुपये थकबाकीचा समावेश आहे. सर्वाधिक थकबाकी ही देगलूर विभागामध्ये असून त्याखालोखाल नांदेड गामिण विभागाचा क्रमांक लागतो.

पाणीपुरवठा योजनासोबतच पथदिव्यांची थकबाकीही प्रचंड प्रमाणात थकीत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतींचे दोन हजार ९७ वीजकनेक्शन असून त्यांच्याकडे १७४ कोटी ९१ लक्ष रुपयांची थकबाकी थकीत आहे. यामध्ये भोकर विभागातील ६९७ पथदिव्यांची ४६ कोटी २६ लक्ष रुपये, देगलूर विभागाकडे ६७३ पथदिव्यांची ५७ कोटी ५१ लक्ष रुपये, नांदेड ग्रामिण विभागातील ६०४ पथदिव्यांची ५८ कोटी ७७ लक्ष रुपये तर नांदेड शहर विभागांतर्गत येणा-या १२३ पथदिव्यांची १२ कोटी ३७ लक्ष रुपये थकबाकीचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यातील वीजयंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी आणि वीजग्राहकांना अखंडीत वीजपुरवठा देण्यासाठी थकबाकी वसुल होणे अत्यंत गरजेचे आहे. नाईलाजास्तव महावितरणला कठोर भूमिका घेणे भाग आहे. ग्रामपंचायतींनी याबाबत सकारात्मक दृष्टीकोण ठेवून थकबाकीसह चालू वीजदेयक भरण्याचे आवाहन प्रभारी मुख्य अभियंता संतोष वाहणे यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com