मुकअभियानातून सशक्त लोकशाहीचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 सप्टेंबर 2018

लातूर : लोकशाहीचा आत्मा निवडणुका आणि निवडणुकांचा आत्मा मतदार याद्या आहेत. मतदार यादीत नाव समाविष्ट करून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला तरच लोकशाही आणखी सशक्त होईल, असा संदेश मुकअभियानातून देत मुकबधीर विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. या अभियानाने भारावलेल्या जिल्हाधिकारी जी. श्रीकांत भारावले यांनी या विद्यार्थ्यांची नवमतदार म्हणून नोंदणी करत त्यांना लोकशाहीचा आवाज दिला.

तहसील कार्यालय व जमियत उलमा संघटनेच्या वतीने शनिवारी (ता. 29) गंजगोलाईतील मदरसा मिस्बाहूल ऊलूममध्ये आयोजित मतदार नोंदणी शिबीरात लोकशाहीच्या जीवंतपणाचा अनुभव सर्वांना आला. विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणीचे प्रात्यक्षिक अभियानातून सादर केले. यामुळेच मदरसामध्ये घेतलेल्या पहिल्या शिबीरात साडेचारशे नवमतदारांनी नोंदणी केली व या भागातील बीएलओंकडे मतदार यादीतील दुरूस्तीबाबतचे अर्जही दिले. भारत निवडणूक आयोगाने यंदा दिव्यांग व महिलांसाठी सुलभ निवडणूकीचे धोरण हाती घेतले आहे. दिव्यांग व महिलांना सहज व सुलभपणे मतदानाचा हक्क बजावता यावा, असा धोरणाचा हेतू आहे. यातूनच घेतलेल्या या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार अविनाश कांबळे, जमियत उलमाचे जिल्हाध्यक्ष मौलाना हाफीज अब्दुल जब्बार साहब मजाहीरी, जनरल सेक्रेटरी मुफ्ती उवैस साहब कास्मी व शहराध्यक्ष मुफ्ती सुहैल साहब कास्मी यांच्यासह मतदार व नागरीक या वेळी उपस्थित होते.     

महिलांनी पुढे यावे

जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले, "अमेरिकेतील महिलांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. भारतात स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसापासून महिलांना मतदार होण्याची संधी आहे. या संधीचे सोने करत महिलांनी सदृढ लोकशाहीसाठी पुढे यावे. दिव्यांगाना मतदानाचे महत्व कळत असेल तर व्यंग नसलेल्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. छायाचित्रासह मतदार यादीला आता प्राधान्य असून त्यासाठी मतदारांना आपले छायाचित्र द्यावेच लागेल."

Web Title: Powerful democracy message in campaign