शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

औरंगाबाद - पोलिसांना इजा पोचवणे, धमकावणे आणि सरकारी मालमत्तेच्या नुकसानीच्या आरोपाखाली शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना आज पोलिसांनी अटक केली. औरंगाबाद शहरात 11 व 12 मे रोजी घडलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली.

गांधीनगर भागातून काल (ता. 20) रात्री पोलिसांनी दंगलीत सहभाग असल्याच्या संशयावरून दोघांना ताब्यात घेतले होते. त्या संशयितांना तत्काळ सोडा, अशी मागणी जैस्वाल यांनी केली. पोलिसांनी यास नकार दिला. त्यानंतर जैस्वाल यांनी त्यांना धमकावत टेबलाची काच फोडली. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत जैस्वाल यांच्यावर सरकारी कामात अडथळा, पोलिसांना इजा पोचवणे, धमकावणे आणि सरकारी मालमत्तेच्या नुकसानप्रकरणी मध्यरात्रीनंतर गुन्हा नोंद झाला.

Web Title: pradeep jaiswal arrested crime