जैस्वाल कारागृहातून 'आयसीसीयू'मध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

औरंगाबाद - पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना मंगळवारी (ता. 22) सकाळी छातीत त्रास जाणवू लागल्याने येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) मेडिसीन विभागाच्या "आयसीसीयू'मध्ये दाखल करण्यात आले आहे. शहरातील दंगल प्रकरणातील दोन तरुणांना तत्काळ जामिनावर सोडण्याच्या मागणीसाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात जैस्वाल यांनी रविवारी रात्री गोंधळ घातला होता. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर जैस्वाल यांना सोमवारी (ता. 21) दुपारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. खारकर यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
Web Title: pradeep jaiswal in ICU sickness