ही तर लोकशाहीतून हुकूमशाही - प्रकाश आंबेडकर

भास्कर बलखंडे
गुरुवार, 19 जुलै 2018

स्वातंत्र्याच्या 70 वर्षात बहुजन समाजाला सत्तेपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याने त्यांचा विकास ठप्प झाला आहे. समाजात अजूनही समता आली नाही. वंचितांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी व सामाजिक समता आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.
 

जालना - स्वातंत्र्याच्या 70 वर्षात बहुजन समाजाला सत्तेपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याने त्यांचा विकास ठप्प झाला आहे. समाजात अजूनही समता आली नाही. वंचितांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी व सामाजिक समता आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.

आघाडीच्या वतीने राज्यात 50 जागांवर उमेदवार निवडून आणा असे आवाहन या अघाडीचे अध्यक्ष तथा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जालना येथे केले. बुधवारी (ता.19) अॅड. आंबेडकर यांच्या उपस्थितीत येथे वंचित बहुजन आघाडीचा मेळावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

अॅड.आंबेडकर म्हणाले की, राज्यघटनेने या देशाला समता, बंधुता दिली पंरतू अद्यापही सामाजिक समता निर्माण होऊ शकली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राज्यघटना बदलून मनुस्मृतीवर आधारीत व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. काय हवे ते निर्णय करा. वंचित असलेल्या समुहाचे अधिकार नाकरून देशात जुनी व्यवस्था आण्यासाठी प्रयत्न होत आहे. लोकशाहीच्या माध्यमातून मोठे जात समहु वर्चस्व स्थापन करून हुकुमशाही लादत आहे. कोणती व्यवस्था हवी आहे याचा निर्णय घेण्याची वेळ अाल्याचे ते म्हणाले. यावेळी, माजी आमदार लक्ष्मण माने, अॅड. मोरे, अकबर इनामदार, दिपक डोके यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: prakash ambedkar criticise on BJP government