आंबेडकरांसोबत दगाबाजी करणाऱ्यांची हकालपट्टी करू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

औरंगाबादेत दलितबांधवांनी साथ दिल्यानेच इम्तियाज जलील खासदार झाले; मात्र अकोला व सोलापूर या लोकसभा मतदारसंघांत मुस्लिम मतदारांनी साथ न दिल्याने दोन्ही ठिकाणी प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला. यावर जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, याबाबत प्रश्‍न उपस्थित केला असता, दगाबाजी करणाऱ्यांची "एमआयएम' हकालपट्टी करेल, असे खासदार इम्तियाज जलील यांनी येथे घोषित केले.

औरंगाबाद  - औरंगाबादेत दलितबांधवांनी साथ दिल्यानेच इम्तियाज जलील खासदार झाले; मात्र अकोला व सोलापूर या लोकसभा मतदारसंघांत मुस्लिम मतदारांनी साथ न दिल्याने दोन्ही ठिकाणी प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला. यावर जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, याबाबत प्रश्‍न उपस्थित केला असता, दगाबाजी करणाऱ्यांची "एमआयएम' हकालपट्टी करेल, असे खासदार इम्तियाज जलील यांनी येथे घोषित केले. तसेच, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांवरही कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला.

गेल्या चाळीस वर्षांनंतर इम्तियाज यांच्या रूपाने येथे मुस्लिम समाजाला खासदार मिळाला आहे. विजयी झाल्यानंतर सोमवारी (ता. 27) इम्तियाज यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar Imtiyaz Jaleel Politics