...तर पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी करणार आंदोलन

राजेभाऊ मोगल
शुक्रवार, 8 जून 2018

औरंगाबाद : सरकारने रेशन दुकानदारांना महिन्याला 30 हजार रुपये मानधन द्यावे, किंवा त्यांना घर चालविण्यासाठी कमीशनच्या माध्यमातून तेवढ्या पैशांची व्यवस्था करावी. सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्या समजून घ्याव्यात, अन्यथा आगामी काळात आंदोलनाची तयारी करावी लागेल. आणि याची सर्व जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डिलर्स फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी येथे सरकारला दिला आहे. विशेष म्हणजे इशारा देणारे मोदी दुसरे तिसरे कुणीही नसून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सख्खे भाऊ आहेत. 

देशभरातील रेशन दुकानदार, डिलर्सच्या मागण्यासंदर्भात फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दौरे सुरू केले आहेत. राज्यातील पहिल्या दौऱ्याची सुरवात त्यांनी येथून केली. गुरुवारी (ता. सात) महाराष्ट्रातील विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक झाल्यानंतर श्री. मोदी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या मागण्या समोर ठेवल्या.

ते म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून गरिबांना अन्न पुरविण्याचे अविरत काम रेशन दुकानदार करीत आहेत. काळाच्या ओघात शिक्षण, वैद्यकीय खर्च, विजेचे बील अशी वाढ झाल्याने महागाई वाढली आहे. त्यामुळे जुन्याच पद्धतीने दिल्या जाणाऱ्या कमिशनमध्ये घर चालवणे अवघड आहे. त्यामुळे एक तर महिन्याला 30 हजार रुपये मानधन द्यावे, अन्यथा कमिशनच्या माध्यमातून घर चालविण्यासाठी तेवढे पैसे मिळतील, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.'' 

""केरळमध्ये 16 हजार रुपये फिक्‍स मानधन दिले जाते. मग इतर राज्यात का नाही, असा सवाल महासचिव विश्‍वंभर बसू यांनी उपस्थित केला. यावेळी राजेश अंबुसकर, किरणपालसिंग त्यागी, गुलाबराव नांद्रे, काकासाहेब देशमुख, सुरेश उल्हे पाटील, डी. एन. पाटील उपस्थित होते. 

भावाच्या नात्याने प्रश्‍न कसे सांगू ?
पंतप्रधान पदावर आपले भाऊ असूनही मागण्या अद्याप का पूर्ण होऊ शकल्या नाहीत, असा प्रश्‍न विचारला असता. प्रल्हाद मोदी म्हणाले, ज्या नरेंद्र मोदी यांनी देशासाठी आपले कुटुंब सोडून देशालाच आपले कुटुंब समजले आहे. थेट त्यांच्यासमोरच आमचे प्रश्‍न मांडणे, हे मला उचित वाटत नाही. मात्र, कधीतरी पंतप्रधान भावांशी फोनवर बोलणे होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Pralhad Modi, brother of PM Narendra Modi to protest against government