औरंगाबादच्या उद्योगाने उभारले पहिले ‘प्री-इंजिनिअर्ड’ शुगर हाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

औरंगाबाद - येथील शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील टेक्‍सास लाइफस्टाइल प्रायव्हेट लिमिटेड (नेक्‍स्ट पीईबी) या उद्योगाने तडवळ (जि. सोलापूर) येथील गोकुळ माऊली साखर कारखान्यासाठी प्री-इंजिनिअर्ड इमारतींच्या तंत्रावर आधारित राज्यातील पहिले ‘शुगर हाऊस’ उभारले. ३९ मीटर उंच असलेल्या या इमारतीचे काम अनेक अडचणींचे आव्हान पेलत अवघ्या ९० दिवसांत पूर्ण झाले.

यासाठी नेक्‍स्ट पीईबीने औरंगाबादमध्ये ३०० पेक्षा अधिक भाग तयार केले. त्यानंतर अवघ्या २० व्यक्तींनी हे सुटे भाग जोडून ३९ मीटर उंच असे शुगर हाऊस तयार केले. पारंपरिक पद्धतीने शुगर हाऊस उभारण्याला पसंती दिली जात असताना या प्री-इंजिनिअर्ड बिल्डिंगचे तंत्र स्वीकारून अशी इमारत उभारणारा हा राज्यातील पहिलाच साखर कारखाना ठरला आहे. 

१०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनचा वापर
अशा प्रकारच्या इमारती उभ्या करण्यासाठी मोकळी आणि सपाट जागा आवश्‍यक आहे; पण काम सुरू करण्याची लगबग असल्याने या शुगर हाऊसमध्ये उत्पादनासाठी लागणारी मोठी यंत्रे अगोदरच बसवण्यात आली होती. त्यामुळे इमारत उभारणीला मोठ्या अडचणी आल्या. आत जागा नसल्याने साध्या क्रेनने काम करणे शक्‍य झाले नाही. दोन बाजू बंद असल्यानेही केवळ दोन बाजूंनी ही इमारत तयार करण्याचे कार्य अवघड होते. त्यासाठी १०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनचा वापर करावा लागला. 

‘जी प्लस १’चे पॅनल रूम
कारखाना आणि उत्पादनावर नियंत्रण करणारी यंत्रणा असलेली पॅनल रूमही नेक्‍स्ट पीईबीने अपेक्षित वेळेपूर्वी तयार केली आहे. जी प्लस १ पद्धतीने तयार केलेली ही पॅनल रूम शुगर हाऊसचे हस्तांतरण करण्यापूर्वी तयार करण्यात आली होती. शुगर हाऊसचे काम पूर्ण करून त्याचे हस्तांतरण मार्च २०१८ मध्ये झाले.

या उद्योगाला ही नवी संकल्पना पटवून देणे, अडचणीच्या ठिकाणी ही उभारणी करणे एक आव्हानच होते. ‘प्री-इंजिनिअर्ड बिल्डिंग’ पद्धतीने पहिल्यांदाच एखाद्या साखर कारखान्याने आपले शुगर हाऊस तयार केले. 
- रणजित कक्कड, व्यवस्थापकीय संचालक, नेक्‍स्ट पीईबी.

Web Title: pre engineered sugar house

टॅग्स