वळवाचा पाऊस आला रेss! परभणीची होरपळ थांबली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

उष्णतेच्या लाटेत होरपळणाऱ्या परभणी जिल्ह्यात आज (बुधवार) ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. त्यामुळे उष्णता कमी होऊन आल्हादायक वातावरण निर्माण झाले आहे.

परभणी : उष्णतेच्या लाटेत होरपळणाऱ्या परभणी जिल्ह्यात आज (बुधवार) ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. त्यामुळे उष्णता कमी होऊन आल्हादायक वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान मंगळवारी रात्री उशीरा या भागात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कात्नेश्वर येथे रात्री नऊच्या सुमारास गारपीट झाली.

गेल्या तीन महिन्यांपासून परभणी जिल्हा उष्णतेच्या भंयकर लाटेत भाजुन निघत आहे.सतत 45 आणि 46 अंशावर तापमान राहील्याने जिल्ह्याची होरपळ झाली आहे.अगदी गेल्या रविवारपर्यंत तापमान वाढलेले होते.

सोमवारी दुपारपर्यंत पारा चढलेला होता. मात्र सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने मंगळवारी पारा कमी झाला आहे. रात्री पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विजांचा कडकडाट रात्री उशीरापर्यंत सुरु होता.

परभणी शहर, ग्रामीण भाग, पूर्णा, पालम तालुक्यात अर्धा तास पाऊस झाला. कात्नेश्वर शिवारात रात्री नऊच्या सुमारास गारांसह पाऊस झाला. चुडावा,नऱ्हापुर,झिरोफाटा या भागात जोरदार पाऊस झाला. बुधवारी देखील पहाटे पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या.परभणी शहरात सकाळी 11  नंतर सूर्यदर्शन झाले. ढगाळ वातावरण आणि थंड वारे यामुळे आल्हादायक वातावरण तयार झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pre monsoon showers in Parbhani ahead of Monsoon 2019