प्रेमपत्र थेट आईच्या हाती;  प्रेमवीर पोलिस कोठडीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

मला तू आवडतेस, तुलाही मी आवडत असेल तर सांग, असा मजकूर लिहिलेले प्रेमपत्र मजनूने एका मुलीस देण्यासाठी तिच्या भावाजवळ दिले. पण, भावाने ते प्रेमपत्र थेट आईजवळ दिल्याने प्रेमविराची रवानगी थेट पोलिस कोठडीत झाली

अंबाजोगाई - "मला तू आवडतेस, तुलाही मी आवडत असेल तर सांग' असा मजकूर लिहिलेले प्रेमपत्र मजनूने एका मुलीस देण्यासाठी तिच्या भावाजवळ दिले. पण, भावाने ते प्रेमपत्र थेट आईजवळ दिल्याने प्रेमविराची रवानगी थेट पोलिस कोठडीत झाली. त्याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला आहे. हा प्रकार तालुक्‍यातील साकुड येथे गुरुवारी (ता. आठ) समोर आला.

 

कुलदीप उर्फ बबल्या अशोक रोडे (रा. साकुड, ता. अंबाजोगाई) असे या आरोपीचे नाव आहे. 
कुलदीप उर्फ बबल्या अशोक रोडे अनेक दिवसांपासून गावातील एका 15 वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करत होता. विद्यार्थिनी शाळेत ये-जा करताना तो तिला अडवून छेड काढत असे. मंगळवारी ही विद्यार्थिनी बॅंकेत खाते काढण्यासाठी आईसोबत अंबाजोगाईला आली.

 

या वेळी घरात तिचा आठवर्षीय लहान भाऊ एकटाच होता. कुलदीपने तिच्या लहान भावाला स्वतःच्या घरी बोलावून घेतले आणि "तुझी दीदी कुठे आहे?,' अशी विचारणा केली. त्यानंतर एक चिठ्ठी त्याने भावाच्या हातात ठेवली आणि कोणालाही न सांगता तुझ्या बहिणीला दे, असे सांगितले. मात्र, दोघी घरी आल्यानंतर या मुलाने ही चिठ्ठी थेट आईजवळ दिली आणि या प्रेमविराचा भंडाफोड झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Premvir in police custody