उदगीरमध्ये नोटा बदली प्रकरणात सात जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

उदगीर - शहरातील नोटा बदली प्रकरणात संशयित सात जणांच्या रॅकेटच्या चौकशीत पोलिसांच्या हाती काहीही लागले नसल्याने बुधवारी (ता. 18) या सात जणांविरुद्ध शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. तर उपविभागीय दंडाधिकारी यांनी या सात जणांची जामिनावर सुटका केली आहे. 

या प्रकरणात उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. तर या सात जणांची पोलिसांनी तीन दिवस कसून चौकशी केली असता या संशयित सात जणांनी एक टक्का कमिशनच्याच लालसेपोटी शहरात आल्याचे कबूल केले आणि यात लातूरचा संतोष कांबळे व अन्य दोघांनीच येथे बोलाविल्याचे सांगितले. याशिवाय कुठलीही माहिती त्यांच्याकडून पोलिसांना मिळाली नसल्याने, चौकशीअंती काहीही निष्पन्न झाले नाही, असे पोलिसांनी सांगितले. यात सुशील नटवरलाल बुद्धदेव (रा. औरंगाबाद), कल्पेश अरुणभाई चंदे (रा. बार्शी, जि. सोलापूर), आमेर आलीम शेख (रा. बीड), सिकंदर नक्कीओद्दीन खतीब (रा. बीड), चेतन बाहुबली गंगवाल (रा. औरंगाबाद), सुरेश नटवरलाल बुद्धदेव (रा. बीड) व मयूर राजेंद्र बोहरा या सात जणांविरुद्ध कलम 110 सीआरपीसीप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून उपविभागीय दंडाधिकारी उदगीर यांच्यापुढे उभे करण्यात आले. उपविभागीय दंडाधिकारी यांनी त्यांना जामिनावर सोडल्याचे पोलिस निरीक्षक भीमाशंकर हिरमुखे यांनी सांगितले.

Web Title: preventive action in the case of seven people posted notes

टॅग्स