दुष्काळामुळे ज्वारी, बाजरी, गव्हाचे दर वाढले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

बीड  - यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने रब्बी व खरिपाचे उत्पादन झालेच नाही. यामुळे मार्केटमध्ये धान्याची आवक कमी प्रमाणात झाली; पण मागणी आहे तशीच राहिल्याने ज्वारी, बाजरी, गव्हाचे दर वाढले आहेत. सर्वसामन्यांना आता दुष्काळाच्या झळांबरोबर महागाईच्या झळा बसत आहेत. 

बीड  - यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने रब्बी व खरिपाचे उत्पादन झालेच नाही. यामुळे मार्केटमध्ये धान्याची आवक कमी प्रमाणात झाली; पण मागणी आहे तशीच राहिल्याने ज्वारी, बाजरी, गव्हाचे दर वाढले आहेत. सर्वसामन्यांना आता दुष्काळाच्या झळांबरोबर महागाईच्या झळा बसत आहेत. 

जिल्ह्यात सरासरीपेक्षा अर्धाच पाऊस पडल्याने येथील रब्बीची व खरिपाची पिके जळून गेली. यामुळे सध्या जिल्ह्यात पाण्यासह धान्यांचे दर वाढले आहेत. पशुधनासाठी चाऱ्याचाही प्रश्‍न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. रोजंदारीचे काम करणाऱ्या मजुरांना एक तर हाताला काम नाही, त्यात धान्यांचे दर वाढल्याने त्यांना धान्य खरेदी करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ आली आहे. सध्या जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळासह महागाईच्या झळा बसत आहेत. पूर्वी 1500 रुपये असणारी ज्वारी सध्या चार हजारांवर गेली आहे. आवक कमी व मागणी वाढल्याने धान्यांचे भाव वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

गेल्या वर्षीचे दर 
धान्यांचे प्रकार दर 
- संकरीत बाजरी-1,200 
-ज्वारी -1500 
-गहू-1700 

सध्याचे दर 
धान्यांचे प्रकारदर 
-बागायती ज्वारी-4000 
-संकरीत बाजरी-2400 
-गहू-2700 

दरवर्षीच्या तुलनेने यंदा शेतातील उत्पादनात घट झाली आहे. यामुळे शेतातून मार्केटमध्ये माल आलाच नाही. दुसरीकडे धान्यांची जी मागणी होती ती तशीच राहिल्याने यंदा धान्यांचे भाव वाढले आहेत. 
- बाळासाहेब कवडे, व्यापारी, बीड 

आम्ही मोलमजुरी करून कुटुंब चालविण्याचा प्रयत्न करीत आहोत; परंतु या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शहरातील बांधकामे बंद आहेत. त्यामुळे हाताला काम मिळणे अवघड झाले आहे. त्यात धान्यांचे भाव वाढल्याने खाण्याचे वांदे झाले आहेत. 
- तुकाराम लाड, मजूर, बीड 

Web Title: Prices of jowar bajra and wheat increased due to drought

टॅग्स