माजी सैनिकांच्या पाल्यांना 'पंतप्रधान शिष्यवृत्ती'

प्रल्हाद कांबळे 
गुरुवार, 17 मे 2018

नांदेड : केंद्र शासनाकडून दिली जाणारी पंतप्रधान शिष्यवृत्ती जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या सात पाल्यांना मंजूर झाली आहे. तसेच या पाल्यांना पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. येथील माजी सैनिक कल्याण कार्यालयाच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.

देशसेवेतून निवृत्त झालेल्या पाल्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार विविध योजनेतून त्यांना व त्यांच्या पाल्यांना मदत करते. माजी सैनिक कल्याण कार्यालयाचे समन्वयक कमलाकर शेटे, सत्येंद्र चावरे आणि संजय देशपांडे हे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करतात. मंजुरीसाठी केंद्रसरकारकडे कर्नल सुहास जतकर हे पाठवून मंजुर करून घेतात.

माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यातील सात विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे. कविता रामदास कदम (किनवट), यशोदा गोविंदराव शेंबाळकर (नांदेड),  वैशाली धोंडिबा कोळेकर (मुखेड),  धनश्री राजेश्वर जोशी (लोहा), ज्योती दिलीप व्यास,(नांदेड), सोनी प्रभाकर डाके (नांदेड) आणि प्रतिक्षा हनमंतराव शिवनकर (लोहा) यांची निवड झाली आहे. प्रतेकी २७ हजार रुपये जमा झाले आहे. 

Web Title: prime minister scholarship for ex serviceman son and daughters