कॅशलेसच्या माध्यमातून पंतप्रधानांची चीनला मदत - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

औरंगाबाद -  कॅशलेस व्यवहारासाठी चीनच्या पेटीएम सॉफ्टवेअरचा वापर होत आहे. शंभर रुपयांसाठी दोन रुपये कमिशन घेणाऱ्या या कंपनीला अर्थात चीनला लाखो कोटी रुपये या माध्यमातून मिळत आहेत. चीन हा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना मदत करत असल्याचे जगजाहीर असताना, भाजप सरकार पेटीएमच्या माध्यमातून चीन आणि पाकिस्तानला मदत करत असल्याचा आरोप ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

भारिप- बहुजन महासंघाच्या विभागीय मेळाव्यासाठी शहरात आलेल्या ऍड. आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला. मोदींचा नोटाबंदीचा निर्णय चुकीचा आणि तुघलकी आहे. मोदी हे संसदेत बोलत नाहीत, सभागृहाचा नेता आणि विरोधी पक्षनेता यांना संसदेत बोलण्याचा कायदेशीर अधिकार आहे, त्यांना बोलायचे म्हटल्यावर सभागृह उभे राहते. असे असताना, आपल्याला संसदेत बोलू दिले जात नाही, हे पंतप्रधानांचे म्हणणे खोटे आहे; मात्र ते का बोलत नाहीत, याचे उत्तर संघाने दिले पाहिजे, अशी अपेक्षा ऍड. आंबेडकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Prime Minister's support to China through the cashless