परभणी जिल्ह्यात जुगार अाड्यावर छापा ! ...

फोटो
फोटो

सेल (जि. परभणी) : वालूर (ता.सेलू) येथून अर्धा किलोमिटर अंतरावरिल वाई-चारठाणा रस्त्यावरिल एका जुगार अाड्यावर जिंतूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी श्रवण दत्त यांच्या पथकाने गुरूवारी (ता.१२) रात्री साडे आठच्या सुमारास छापा टाकुन रोख रक्कमेसह सुमारे ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करून सतरा जुगाऱ्यांना अटक केली.

वालूर (ता.सेलू) शिवारातील वाई-चारठाणा रस्त्यावरिल रविंद्र पन्नालाल कलाल यांच्या शेतातील जूनाट झालेल्या कुकुट पालन शेडमध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती जिंतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रवण दत्त यांना मिळाली. या माहितीच्या आधारे श्री.दत्त यांनी सापळा रचून गुरूवारी रात्री साडेअाठच्या सुमारास जुगार अाड्यावर छापा टाकला. या वेळी झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतांना सतरा अारोपी अाढळून अाले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, नगदी दोन लाख पंच्याहत्तर हजार ८४ रूपये अाणि चारचाकी वाहन, मोटार सायकल, मोबाईल असे मिळून ३१ लाख ९३ हजार ५६४ रूपये असा मुद्देमाल हस्तगत केला.


सतरा आरोपींना अटक


सतरा अारोपींना पोलिसांनी अटक केली असून जिंतूर पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई नामदेव मंचकराव डूबे यांच्या फिर्यादिवरून सेलू पोलिस ठाण्यात जुगार खेळणारे रमेश गिरीधारीलाल जैस्वाल (रा.राजवाडी ता.सेलू), राजेभाऊ किशन बोराडे (रा.मंठा जि.जालना), शेख जावेद शेख मन्नान, जयकुमार नंदलालजी राठी (रा.मानवत), अाशिष रमाकांत वट्टमवार (रा.जिंतूर), निलेश जुगलकिशोर राठी (रा.मानवत), शेख नजिर शेख कबीर (रा.जिंतूर), शिवनारायण गंगाभिषण सारडा (रा.मानवत), जावेदखान रूस्तूमखान (रा.परभणी), शहाजी शहागुलाब शहा (रा.परभणी), नामदेव अाप्पाराव कनसे (रा.बोरगाव), कैलास साहेबराव देशमुख (रा.जिंतूर), सय्यद इरफार सय्यद हूसेन (रा.पोखर्णी नृसिंह), संदिप पंडितराव भांबळे (रा.जिंतूर), मानिक पंडितराव वाघ (रा.पोखर्णी नृसिंह), शंकर मुंजा तरटे (रा.मानवत), मदन पापालाल चारण (रा.परभणी) हे सतराजण जुगार खेळतांना अाडळून अाल्याने त्यांना अाटक करण्यात अाली अाहे. या प्रकरणी सेलू येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री.पांडे हे  घटनेचा पुढील तपास करित अाहेत.


सेलूचे ‘डिवायएसपी’ धडाडी दाखवणार का?


तालुक्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या जुगार अड्डे सुरू अाहेत. काहि ठिकाणी तर मनोरंजनाच्या नावाखाली सर्रास जुगार अड्डा चालविण्यात येत अाहे. विशेष म्हणजे जिल्हा अाणि इतर शहरातून या अाड्यावर जुगार खेळणाऱ्यांची जुगाऱ्यांची संख्या अधिक अाहे.`हे सर्व प्रकार सुरू असतांना सेलूतील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे हे कारवाई करित नाहित. अनेक वेळा जिंतूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी श्रवण दत्त यांना सेलूत येऊन कारवाई करावी लागते. त्यामुळे श्री. दत्त यांच्या प्रमाणे श्री. एकबोटे हे धडाडी का दाखवत नाहित? असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित होत अाहे.

अाड्डा चालक मोकळाच...


वालूर (ता.सेलू) परिसरात झन्ना मन्ना नावाचा विनापरवाना जुगार अड्डा गेल्या अनेक महिण्यापासून सुरू होता.हा अाड्डा  चालवणारा मालक परभणी येथिल असल्याची माहिती अाहे.मात्र या चालकाविरोधात पोलिस प्रशासनाने अद्यापपर्यंत कुठलिच कारवाई केली नसल्याने या प्रकरणी उलटसुलट चर्चेला उधान अाले अाहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com