बनावट नोटांचा घरातच छापखाना! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

- 44 हजारांच्या शंभर, दोनशेच्या नोटा जप्त 
- खरे दहा हजारही पकडले 
- बारी कॉलनीत कारवाई 
 
औरंगाबाद - घरातच छापखाना उघडून शंभर, दोनशेच्या बनावट नोटांची निर्मिती करण्याचा कुटिल "उद्योग' दोन व्यापाऱ्यांनी केला. जिन्सी पोलिसांनी त्यांच्यावर छापा घालून बनावट 44 हजार रुपये; तसेच खरे दहा हजार रुपये जप्त केले. याशिवाय नोटा तयार करण्याचे 29 हजारांचे साहित्य ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी (ता. 21) दुपारी पाऊणेतीनच्या सुमारास बारी कॉलनीतील करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शेख हारुण शेख बशीर (वय 37, रा. बारी कॉलनी) व शोहरत अजगरअली (वय 25, रा. रहेमानिया कॉलनी) अशी संशयितांची नावे आहेत. दोघेही व्यापारी आहेत. बारी कॉलनी येथे घरातच स्कॅनर व प्रिंटरच्या साह्याने बनावट नोटांची निर्मिती करून त्या बाजारात विक्री करीत होते. विक्री करण्यासाठी एजंटांचाही ते शोध घेत होते. याबाबत सहायक फौजदार अय्युब पठाण यांना माहिती समजली. त्यांच्यासह पोलिस पथकाने शहनिशा करून बारी कॉलनीत शेख हारुण यांच्या घरी छापा घातला. त्यावेळी दोनशेच्या दीडशे बनावट नोटा अर्थात 30 हजार रुपये, शंभराच्या एकशे चाळीस बनावट नोटा अर्थात 14 हजार रुपये त्यांच्याकडे सापडले. यासह घरात दोन प्रिंटर सापडले. यात एक प्रिंटर नादुरुस्त होते. पोलिसांनी सर्व माल जप्त करून बनावट नोटांसह संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली; पण पोलिसांना त्यांनी उडवाउडवीची उत्तरेही दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक श्‍यामसुंदर वसुरकर, उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहायक फौजदार अय्युब पठाण, शेख रफिक, हवालदार शेख हारुण, भाऊसाहेब जगताप, संजय रोकडे, संजय गावंडे, बाळू थोरात, धनंजय पाडळकर, ज्ञानेश्‍वर बाविस्कर, संजय झरे, गणेश नागरे यांनी केली. 

छाप्यात सापडले कोरे बॉंड 
पोलिसांनी छापा घातला त्यावेळी घरात पंधरा कोरे बॉंड सापडले. तसेच दोनशे रुपये किमतीच्या नोटांचे रंगीत झेरॉक्‍स प्रिंट, एक कैची, दहा हजारांच्या खऱ्या नोटा असा 29 हजार 150 रुपयांचा ऐवज सापडला. हा पोलिसांनी जप्त केला. रुजू होताच सहायक फौजदार अय्युब पठाण यांनी ही कामगिरी केली. 

Web Title: Print notes in the house