जालना जिल्हा कारागृहात कैद्याची आत्महत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

रमेश गणेश हिवाळे याला बाललैंगीक अत्याचार प्रकरणीत अटक करण्यात आली होती. त्याला मौजपुरी पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. 

जालना : जिल्हा कारागृहाच्या बेरिगेट नंबर दोनमधील कैद्याने सोमवारी (ता.27) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. रमेश गणेश हिवाळे ( वय 20, रा. हातवन, ता. जि. जालना) असे कैद्याचे नाव आहे.

रमेश गणेश हिवाळे याला बाललैंगीक अत्याचार प्रकरणीत अटक करण्यात आली होती. त्याला मौजपुरी पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. 21 ऑगस्ट रोजी त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती.

सोमवारी (ता. 27) पहाटे सव्वाबारा वाजन्याच्या सुमारे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.27) पहाटे उघड़कीस आली. 

Web Title: prisoner suicide in Jalna

टॅग्स