गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

औरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला नागरिक व रुग्णवाहिका चालकांच्या मदतीने पकडण्यात आले. दुसरा मात्र मकाई गेटमार्गे पसार झाला. 

सोमवारी (ता. 23) सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. सोनू दिलीप वाघमारे (वय 20) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. अक्षय आठवले (रा. मूळ बीड) असे पकडलेल्या कैद्याचे नाव आहे. घाटी प्रशासनाने सांगितले की दोघे घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. 

त्यांना सर्जरी विभागातील कैद्यांच्या विशेष वार्ड क्रमांक 10 येथे ठेवण्यात आले होते. तेथून गस्तीवरील पोलिसाला मारहाण केली करुन त्यानी पळ काढला. ही बाब लगेच परिसरात समजली. दोघे पळत असताना अक्षय आठवले याला पकडण्यात आले. याचवेळी सोनू तुरी देऊन पसार झाला व त्याने मकाईगेटच्या दिशेने धाव घेतली. या घटनेची माहिती घाटीतील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवप्रसाद बिराजदार यांनी शहर पोलिस आणि हर्सूल कारागृह प्रशासनाला दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prisoners escaped form hospital