गस्तीवरील पोलिसाला मारून घाटी रुग्णालयातून कैदी पळाले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

औरंगाबाद : शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील
वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला नागरिक व रुग्णवाहिका चालकांच्या मदतीने पकडण्यात आले. दुसरा मात्र मकाई गेटमार्गे पसार झाला.

आज (सोमवार सकाळी सातच्या सुमारास हि घटना घडली. सोनू दिलीप वाघमारे (वय 20, रा. राजीवनगर) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. अक्षय शामराव आठवले (रा. मंत्री कॉलनी, माळीवेस, बीड) असे पकडलेल्या कैद्याचे नाव आहे.

Web Title: Prisoners escaped from the hospital and Hitting the police

टॅग्स