पृथ्वीराज साठे आता केजमधून राष्ट्रवादीचे उमेदवार

प्रशांत बर्दापूरकर
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

केज मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना निश्चित मानली जात आहे.

अंबाजोगाई (जि. बीड) : केज मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना निश्चित मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेल्या नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने साठे यांचे नाव समोर आले आहे.

दरम्यान, दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांच्या अकाली निधनाने झालेल्या पोटनिवडणुकीत २०१२ मध्ये पृथ्वीराज साठे विजयी झाले होते. तत्पुर्वी साठे यांनी अंबाजोगाईचे नगराध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे.

दरम्यान, त्यांनी या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागीतली होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी भाजप प्रवेश केल्याने राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला होता. यात आता पृथ्वीराज साठे यांचे नाव समोर आले आहे. पक्षातील नेत्यांसह काँग्रेसनेही त्यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती आहे. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prithviraj Sathe now a NCP candidate from Cage