'भाजप सरकारने फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार पायदळी तुडविले'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

देशातील शिक्षणावर सर्वकाही अवलंबून आहे. उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले तरच देश घडू शकतो, उच्च दर्जाचं शिक्षण देण्याच काम सरकारचे आहे. शिक्षकांना त्या मूलभूत गरजा भागवता येतील अशा पद्धतीचं वेतन आणि शाळेतील इन्फ्रास्टूक्चर देण्याचं काम हे सरकारच आहे, तर देश घडविण्याचे काम हे शिक्षकांच आहे. सरकारला भान राहिलेले नाही, शाळेचे खाजगीकरण, शिक्षणाचे बाजारीकरण केले जात आहे.

औरंगाबाद : आज राज्यात आणि देशात फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पायदळी तुडवले जात आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिति शर्मा मेनन यांनी केला. 

महात्मा जोतीराव फुले शिक्षण परिषद तर्फे आयोजित राज्य शिक्षक राज्यस्तरीय शिक्षण परिषद पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम आदमी पक्षाचे नेते, महाराष्ट्र प्रमुख सुधीर सावंत, प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, रजनी नागवंशी, अॅड. गजानन कदम यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्रिति शर्मा म्हणाल्या की, देशातील शिक्षणावर सर्वकाही अवलंबून आहे. उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले तरच देश घडू शकतो, उच्च दर्जाचं शिक्षण देण्याच काम सरकारचे आहे. शिक्षकांना त्या मूलभूत गरजा भागवता येतील अशा पद्धतीचं वेतन आणि शाळेतील इन्फ्रास्टूक्चर देण्याचं काम हे सरकारच आहे, तर देश घडविण्याचे काम हे शिक्षकांच आहे. सरकारला भान राहिलेले नाही, शाळेचे खाजगीकरण, शिक्षणाचे बाजारीकरण केले जात आहे. दिल्ली सरकारने एकूण बजेटच्या 25% तरदुत शिक्षणासाठी आहे. दिल्लीचा शाळेत स्विमिंगपूल मैदान आणि सर्व सोयींनीयुक्त यंत्रणा सज्ज केली आहे. खाजगी शाळेतील बेकायदेशीर घेणारे शुल्क परत करायला लावण्याचे काम केजरीवाल सरकारने केली आहे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया हे शिक्षणाच्या प्रश्न प्रचंड लक्ष घातले. त्यामुळे दिल्लीच्या शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. शिक्षणासाठी देशात दिल्लीचे मॉडेल स्वीकारण्याची गरज आहे. दिल्ली मॉडेलने देशापुढे आदर्श ठेवला असे त्या म्हणाल्या, गुजरात मॉडेलने देशाचे तुकडे करायला लावले. देशात मनुचे, नथुराम गोडसे यांचे पुतळे उभारले जात आहेत, है देश घडवु शकत नाही, असा आरोप त्यांनी केला.

Web Title: Priti Sharma Menon criticize BJP