esakal | खासगी रूग्णालयाच्या कोरोना उपचार पद्धतीवर हवं लक्ष

बोलून बातमी शोधा

private covid center

खासगी रूग्णालयाच्या कोरोना उपचार पद्धतीवर हवं लक्ष

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना: कोरोना रूग्णांवर शासकीय रूग्णालयासह खाजगी रूग्णालयांमध्ये कोविड सेंटर उभारून उपचार केले जात आहेत. परंतु, अनेक कोरोना रूग्णांचे खाजगी रूग्णालयांचे बिल लाखो रूपयांच्या घरात जात आहेत. त्यामुळे राज्य शासनाकडून खाजगी रूग्णालयाच्या बिलांचे ऑडिट केले जाते. मात्र, राज्य शासनाच्या कोविड टास्क फोर्सने नेमून दिलेल्या उपचार पद्धती पालन होत का ? त्यानुसार रूग्णांना औधषी देण्यात येतात का ? यावर ही लक्ष केंद्रीत करणे अपेक्षित आहे.

त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे तीन जणांचे एक पथक खाजगी रूग्णालयाच्या उपचार पद्धतीची तपासणी करत आहे, असा दावा केला जात आहे. परंतु, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही, असे खाजगी हाॅस्पिटलमधील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: Coronavirus : 'या' चार गोष्टींना स्पर्श केल्यानंतर त्वरित धुवा हात!

जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रूग्णांना बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यात खाजगी रूग्णालयात रूग्ण दाखल झाल्यानंतर गरिबाच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांचा सर्वाधिक ओढा शासकीय रुग्णालयाकडे आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेवर मोठा तान निर्माण झाला आहे. ज्या रूग्णांची आर्थिक परिस्थीती ठिक-ठाक आहे, असे कोरोना रूग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेतात.

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी गाईड लाईन तयार केली आहे. या गाईड लाईननुसार शासकीय कोविड रूग्णालयांसह खाजगी कोरोना रूग्णालयात उपचार करणे बंधनकारक आहे. त्यामुळे या गाईड लाईननुसार खाजगी रूग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार होतात की नाही, यावर शासनाकडून लक्ष ठेवणे अपेक्षित आहे.

हेही वाचा: 'अनुदान पाहिजे तर दीड लाख द्या', लाचखोर कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

आज घडीला खाजगी कोविड रुग्णालयाच्या बिलांचे आॅडिट शासनाकडून केले जात आहे. त्यात पद्धतीने शासनाच्या गाईड लाईनप्रमाणे खाजगी रूग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार होतात की नाही, याची तज्ञ शासकीय डाॅक्टरांकडून तपासणी होणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून खाजगी रूग्णालयांतील उपचार पद्धती तपासण्यासाठी केवळ तीन जणांचे एक पथक नेमले असून त्यांच्याकडून तपासणी केली जाते असा दावा जिल्हा शल्यचिकीत्यक यांच्याकडून केला जात आहे.

मात्र, प्रत्येक्षात अशी तपासणी होत नाही, असे खाजगी रूग्णालयातील सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे राज्याच्या कोविड टास्क फोर्सने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी दिलेल्या गाईडलाईन पाळल्या जातात की नाही याची शहानिशा करण्यासाठी खाजगी रूग्णालयातील रूग्णांच्या केसपेपरचे आॅडिट होणे ही गरजेचे आहेत.

खाजगी कोविड रुग्णालयात राज्याच्या कोविड टास्क फोर्सने दिलेल्या गाईड लाईनप्रमणे उपचार केले जातात की नाही, हे तपासणीसाठी तीन जणांचे एक पथक नेमलेले आहे. यात या पथकाकडून तपासणी केली जाते.

- डाॅ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकीत्सक, जालना