दोन हजारांची नोट असून अडचण नसून खोळंबा! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

औरंगाबाद - जुन्या हजार-पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर अनेकांनी मोठ्या आनंदाने दोन हजारांच्या नोटा घेतल्या. मात्र, बाजारात चलनतुटवडा असल्याने "दोन हजारांची नोट असून अडचण नसून खोळंबा'सारखी स्थिती निर्माण झाली आहे. दोन हजारांच्या नोटांचे कुणीही सुटे देण्यास तयार नसल्याने दोन हजारांच्या नोटांचे बाजारात वांदे झाले आहेत. 

रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांना दोन हजारांच्या नोटा दिलेल्या आहेत. सध्या बॅंकांकडील शंभर रुपयांच्या नोटासुद्धा संपत आल्याने त्यांनी सरसकट दोन हजारांच्या नोटा देण्यास सुरवात केली. बाजारात हजार रुपयांच्या आत खरेदी केली तरी दोन हजारांची नोट कुणी घेण्यास तयार नाही. कारण शंभर रुपयांच्या दहा नोटा देण्यास दुकानदार तयार होताना दिसत नाही. अनेकांच्या जवळ दोन हजारांच्या नोटा असल्या तरी त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी ही नोट काहीच उपयोगी पडत नसल्याची स्थिती आहे. 

पाचशे रुपयांची नोट दिसेना 

बाजारात किरकोळ व्यवहार करण्यासाठी शंभर, पाचशे रुपयांच्या नोटांची मोठी मदत होते; मात्र औरंगाबादेत बॅंकांकडे पाचशे रुपयांची नोट आलेली नसल्याने सुटे नसल्याची गंभीर स्थिती बाजारात दिसते. आता पाचशे रुपयांची नोट बॅंकांकडे कधी येणार याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेले आहे. पाचशे रुपयांची नोट जर बाजारात आली तर व्यवहार करण्यात काही प्रमाणात मदत होईल असे दुकानदार, विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

Web Title: problem of detention of two thousand note