Video : किडनी प्रत्यारोपनाची अशी असते प्रक्रिया : कशी ते वाचलेच पाहिजे

शिवचरण वावळे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

एखाद्या व्यक्तीची किडनी निकामी झाली असेल आणि त्यासाठी घरातील व्यक्ती किडनी देण्यासाठी पुढे आली म्हणजे किडनी प्रत्यारोपनाची प्रक्रिया होत नाही. किडनी दाता आणि रुग्ण यांच्यात अतिशय महत्वाच्या चाचण्या घेतल्या नंतरच किडनी देणे किंवा घेण्याची प्रक्रियेच्या पुढे जाते, असे सनराईज ग्लोबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे किडनी विकार आणि कीडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. विजय मैदपवाड यांनी सांगितले.


 

नांदेड : क्रॉनिक किडनी फेल्युअरच्या रोग्यासाठी कुठल्याही व्यक्तीची किडनी उपयोगी पडेल असे नसते. प्रथम ज्या व्यक्तीला किडनीची गरज आहे. त्या रोग्याचा रक्तगट लक्षात घेतल्यानंतरच तज्ज्ञ डॉक्टर्स पुढील प्रक्रिया निश्चित करतात. किडनी देणारा आणि घेणारा या दोघांचा रक्तगट जुळण्याबरोबरच दोघांच्या रक्तातील रक्तपेशींमधील एच. एल. ए. चे प्रमाणही जुळावे लागते. एच. एल. ए. चे जुळणे हे टिशु टायपिंग नावाच्या तपासणीने पाहिले जाते.

किडनी प्रत्यारोपण म्हणजे नेमके काय
क्रॉनिक किडनी फेल्युअरच्या रोग्यांत अन्य व्यक्तीची (जिवंत वा मृत) एक निरोगी किडनी शस्त्रक्रियेद्वारे बसवण्याच्या प्रक्रियेला किडनी प्रत्यारोपण म्हणतात. किडनी प्रत्यारोपणाची गरज केव्हा नसते? कोणत्याही व्यक्तीच्या दोन किडन्यांमधील एक किडनी निकामी झाली, तर शरीरातील किडनीशी संबंधित सर्व जरुरी कामे दुसऱ्या किडनीच्या मदतीने होऊ शकतात. तसेच अॅक्युट किडनी फेल्युअरमध्ये योग्य उपचारांनी (औषधे आणि काही रोग्यांच्या बाबतीत थोड्या काळासाठी केलेल्या डायलिसिसने) किडनी पुन्हा पूर्णपणे काम करण्यात मदत करते. अशा रोग्यांना किडनी प्रत्यारोपणाची गरज भासत नाही.

कधी भासते किडनी प्रत्यारोपणाची गरज
क्रॉनिक किडनी फेल्युअर झालेल्या रोग्यांच्या दोन्ही किडन्या जेव्हा ८५ टक्क्यांहून जास्त निकामी होते आणि औषधोपचारास प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा व रोग्यांची तब्बेत सुधारत नाही आणि त्याला नियमित डायलिसिची गरज भासते, अशा रोग्यांसाठी किडनी प्रत्यारोपण हा उपचाराचा दुसरा पर्याय ठरू शकतो.

हेही वाचा - नांदेडच्या सायकलपटूंनी केली कमाल... वाचाच...

किडनी प्रत्यारोपण का गरजेचे?
क्रॉनिक किडनी फेल्युरच्या रोग्यांच्या जेव्हा दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी होतात तेव्हा, त्या रुग्णाची तब्येत चांगली ठेवण्यासाठी आठवड्यात तीन वेळा नियमित डायलिसिस आणि औषधोपचाराची गरज असते. अशा प्रकारच्या रोग्यांची तब्येत ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी केल्या जाणाऱ्या डायलिसिसवर अवलंबून असते. परंतु या रुग्णास किडनी प्रत्यारोपण केल्यानंतर सर्व प्रकारचे उपचार आणि रोजच्या खर्चातुन सुटका होते. तेव्हा यशस्वी किडनी प्रत्यारोपण हा त्यावर एकमेव उत्तम रीतीने जगण्याचा एकमेव परिणामकारक उपाय आहे.

हे देखील वाचाच - नांदेडच्या महिलांना का होतो सासुरवास, वाचा कारणे... ​

असे आहेत फायदे
रोगी इतर सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगू शकतो. दैनंदिन कामकाज सहज करु शकतो. डायलिसिस करण्याच्या कटकटीतून कायमची मुक्ती मिळते. आहरात पथ्य पाळण्याची गरज नाही. रोगी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहतो. पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्यात कोणतीही अडचण येत नाही. रुग्ण महिला बाळाला जन्मही देऊ शकते. सूरुवातीच्या पहिल्या वर्षीच्या उपचारांच्या खर्चानंतर पुढील उपचार कमी खर्चात होतो.

किडनी कोण देऊ शकतो?
सर्वसाधारणपणे १८ ते ५५ वयोगटातील दात्याची किडनी देता आणि घेता येते. स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांना किडनी देऊ शकता. जुळे भाऊ-बहीण हे आदर्श किडनीदाते मानले जातात. पण असे सहजासहजी आढळून येत नाही. आई-वडील, भाऊ-बहिण सर्वसाधारणपणे किडनी दान करण्यासाठी निवडले जातात. जर ह्या किडनी दात्यांकडून किडनी मिळू शकली नाही, तर इतर कुटुंबीयातील नातलगाकडून किडनी घेता येते. हेही शक्य नसेल तर, पती-पत्नीची एकमेकांच्या किडनीची तपासणी केली पाहिजे. इतके करुन देखील कुटुंबातल्या व्यक्तीची किडनी मिळाली नाही तर, अशा वेळी ब्रेनडेड (मेंदू मृत पावलेल्या व्यक्तीच्या किडनीचे) प्रत्यारोपण केले जाते.

हेही वाचलेच पाहिजे- आम्हाला परीक्षेत यश मिळवणे झाले सुलभ ; असं कोण म्हटलं, ते वाचाच

मनातील गैरसमज दूर करण्याची गरज
किडणनी दान करण्यापूर्वी किडनीदात्याची संपूर्ण शारीरक तपासणी केली जाते. दात्याच्या किडन्या योग्य रीतीने कार्यरत आहेत की नाही आणि त्याला एक किडनी दान केल्यानंतर काही त्रास तर होणार नाहीना? हे पूर्णपणे पडताळून पाहिले जाते. साधारणपणे एक किडनी दिल्यानंतर दात्याला कोणताही त्रास होत नाही. तो आपले जीवन पूर्वीप्रमाणेच व्यतीत करु शकतो, शस्त्रक्रियेनंतर पूर्ण आराम केल्यानंतर तो शारीरिक श्रमदेखील करु शकतो. त्याच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही अडचणी येत नाहीत. दात्याने एक किडनी दिल्यानंतर त्याची दुसरी किडनी दोन्ही किडन्यांचे कार्य सभाळते.

किडनी प्रत्यारोपणापूर्वी तपासणी
किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेपूर्वी रोग्याची अनेक प्रकारे तपासणी केली जाते. शस्त्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रुग्णाचे शरीर शस्त्रक्रियेसाठी अनुकूल आहे किंवा नाही या हेतूने या तपासण्या केल्या जातात. त्यात शरीरिक चिकित्सा, लॅबोरेटरी तसेच रेडिओलॉजिकल (सी.टी. स्कॅन, सोनोग्राफी) तपासण्यांचा समावेश असतो.

किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेबद्दलची माहिती
प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमध्ये काय केले जाते? रक्तगट जुळल्यानंतर, एचएलएचे प्रमाण, योग्य आहे की नाही हे निश्चित केल्यानंतर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रियेपूर्वी रोग्याचे नातेवाईक आणि किडनीदात्याचे नातेवाईक यांची संमती घेतली जाते. किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरची एक टीम करते. नेफ्रॉलॉजिस्ट (किडनी विकार तज्ज्ञ), युरोलॉजिस्ट (किडनीचे सर्जन), भूलतज्ज्ञ आणि इतर प्रशिक्षित सहाय्यकांच्या टीमच्या उपस्थितीत युरोलॉजिस्ट ही शस्त्रक्रिया करतात.

हे तुम्ही बघितलेच पाहिजे - Video And Photos : लेकीचे लग्न भारतीय संविधानाला समर्पित - कसे ते वाचायलाच पाहिजे

विशेष म्हणजे किडनीदाता तसेच किडनी मिळणारा रुग्ण या दोघांची शस्त्रक्रिया एकाच वेळी केली जाते. किडनी दात्याची एक किडनी शस्त्रक्रिया करुन काढल्यानंतर ती विशेष प्रकारच्या थंड द्रवात पूर्णपणे साफ केली जाते. त्यानंतर ही किडनी क्रॉनिक किडनी फेल्युअरच्या आजारी रुग्णाच्या पोटाच्या पुढील भागात उजव्या, खालच्या बाजूला प्रत्यारोपित केली जाते. सर्वसाधारणपणे रोग्याची निकामी किडनी काढली जात नाही. मात्र ही निकामी झालेली किडनी शरीराला हानी पोहोचवत असेल तर, अशा अपवादात्मक बाबीत किडनी काढणे गरजेचे ठरते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Procedure For Kidney Transplantation Is: To Must Read It Nanded News