आता जिल्ह्यात दोन लाख लिटर दुधावर प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

औरंगाबाद - दूध खराब होऊ नये यासाठी दुधाला थंड ठेवून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा दूध उत्पादक संघाच्या गांधेली येथील दूध प्रक्रिया प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी ५० हजार लिटर दुधावर प्रक्रिया केली जात असून, ही क्षमता एक लाख लिटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. याशिवाय सिल्लोड तालुक्‍यातील भवन येथे ३० हजार लिटर क्षमतेचे शीतकरण केंद्र पूर्णत्वाच्या मार्गावर असून, तीन खासगी प्रकल्पांत ६५ हजार लिटर दुधावर प्रक्रिया होणार आहे.

सध्या जिल्ह्यात दूध उत्पादनात वाढ झाली आहे. दूध खराब होऊ नये यासाठी शीतगृहात ठेवावे लागते. यानंतर त्यावर प्रक्रिया करून अन्य दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. शासनाचे ५० हजार लिटर क्षमतेचे शासकीय दूध डेअरीच्या जागेत दूध प्रक्रिया युनिट असले तरी यंत्रसामग्री अतिशय जुनी झाल्याने ती २००९ पासून बंद आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा दुग्ध विकास अधिकारी एस. आर. शिपूरकर म्हणाले, गांधेली येथील प्रकल्पासाठी १३ कोटी ९१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच भवन (ता. सिल्लोड) येथे ६ कोटी २ लाख रुपये खर्चून ३० हजार लिटर क्षमतेच्या शीतकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासह इतर खासगी प्रकल्प मिळून जिल्ह्यात सुमारे दोन लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याच्या सोयीसुविधा लवकरच उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

आकडे बोलतात...
 गांधेली येथे एक लाख लिटर दुधावर होणार प्रक्रिया
 भवन (ता. सिल्लोड) येथे ३० हजार लिटर क्षमतेच्या शीतकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात. 
 फुलंब्री येथे राजामृत मल्टीस्टेट यांचे १० हजार लिटर क्षमतेचे.
 तीन खासगी प्रकल्पांत ५५ हजार लिटर दुधावर शीतकरण प्रक्रिया करण्याची यंत्रणा तयार.

Web Title: process on 2 lakh leter milk