जालन्यात स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारणीची प्रकिया सुरू: राज्यपाल सी. विद्यासागरराव

The process of setting up Skill Development Center in Jalna has begun says Governor C Vidyasagarrao
The process of setting up Skill Development Center in Jalna has begun says Governor C Vidyasagarrao

जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जालना येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून जिल्हाधिकारी यांनी यासाठी 25 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती राज्यपाल सी. विद्यासागरराव यांनी दिली आहे. 

गणपती नेत्रालयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त सोमवारी (ता. 17) आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागरराव बोलत होते. याप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, गणपती नेत्रालयाचे चेअरमन राजेंद्र बारवाले आदींची उपस्थिती होती. यावेळी स्व. बद्रीनाराय बारवाले यांच्यावर लेखीत 'द कॉफी टेबल' या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. 

यावेळी राज्यपाल सी. विद्यासागरराव म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जालना येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू होणार आहे. भारत हा स्किल कॅपिटल बनवणे हे प्रधानमंत्री नरेंद मोदी यांचे व्हीजन आहे, असे नमूद करून राज्यपाल म्हणाले की, गणपती नेत्रालयाच्या वतीने अत्याधुनिक सुविधांबद्दल समाधन व्यक्त करत म्हणाले की हे नेत्रालय महाराष्ट्रात दुसर्‍या क्रमांकाचे आहे. गणपती नेत्रालयाच्या माध्यमातून स्व. डॉ. बद्रीनारायण बारवाले यांनी आपली सामाजिक बांधीलकी कायम ठेवली आहे. या रुग्णालयाचा ग्रामीण भागातील नागरिकांना फायदा होत आहे. आतापर्यंत दोन लाख शस्त्रक्रिया तर सात लाखांपेक्षा अधिक रुग्णाची तपासणी केली आहे. तसेच या कार्यक्रमात दोन गावे अंधत्व मुक्त केल्याचे ही नेत्रालयाने जाहीर केले आहे. गणपती नेत्रालयाची प्रत्येक जिल्ह्यात शाखा उघडावी, असे ही ते म्हणाले. 

मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये स्व. डॉ. बद्रीनारायण बारवाले हे सक्रिय होते. स्व. बारवाले यांनी महाराष्ट्र हायब्रीड सीड्सची स्थापना केली. यामधून त्यांनी शेतकर्‍यांसाठी भगिरथाची भूमिका निभावून शेतकर्‍यांसाठी कृषी गंगा आणली. जागतिक पातळीवर पुरस्कार मिळालेले स्व. बारवाले हे एकमेव व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नांंसह आयुष्य उंचावण्यात मोठा वाटा आहे, असेही राज्यपाल सी. विद्यासागरराव म्हणाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री बाबनराव लोणीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची ही भाषणे झाली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com