‘या’ पुनर्भार बिटी वाणाची उत्पादन क्षमता अधिक

फोटो
फोटो

नांदेड : नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात विकसित झालेली ‘नांदेड - ४४’ बीटी कपाशी सतत फलधारणा होणारे वाण आहे. यामुळे इतर वाणापेक्षा या कपासीची उत्पादन क्षमता अधिक असल्याची माहिती वसंतराव नाइक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कापूस संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. खीजर बेग यांनी शेतकऱ्यांना दिली.

अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील प्रगतीशील शेतकरी प्रफुल्ल देशमुख यांच्या शेतावर ‘एनएचएच - ४४’ (नांदेड - ४४) कपाशीचे पीक प्रात्याक्षिक कार्यक्रम नुकताच झाला. या वेळी महाबीजचे विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनुने, कीटकशास्त्रज्ञ डॉ. शिवाजी तेलंग, उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी श्री. शिंगाडे, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. देविकांत देशमुख, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक निकम, तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

44- बीटी कपाशी वाण अळीस कमी बळी पडते

पीक पाहणीनंतर झालेल्या कार्यक्रमात डॉ. बेग म्हणाले, नांदेड कापूस संशोधन केंद्रात विकसित झालेले संकरित कपाशी एनएचएच - ४४ बीटी कपाशी वाण अळीस कमी बळी पडते. या वाणाचे महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे या वाणाला सतत फलधारणा होते. यामुळे इतर बीटी वाणापेक्षा या कपाशीची उत्पादन क्षमता अधिक आहे, असे ते म्हणाले.

केळीच्या रोपांची नोंदणी करण्याचे आवाहन
 
यावेळी डॉ. तेलंग यांनी कपाशीवरील कीडीविषयी मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधीकारी आर. टी. सुखदेव यांनी शासनाच्या योजनांची माहिती दिली. डॉ. देशमुख यांनी हळद पिकाबद्दल माहिती दिली. प्रगतीशील शेतकरी हणुमंत राजेगोरे यांनी महाबीजच्या उतीसंवर्धित केळीच्या ग्रॅन - ९ या वाणाची माहिती दिली. अशोक निकम यांनी केळीच्या रोपांची नोंदणी करण्याचे आवाहन केले.

पहिल्यांदाच ‘महाबीज’चे कपाधी बीटी बियाणे

जिल्ह्यात दोन लाख १५ हजार हेक्टरवर संकरित कपाशीची लागवड होते. यात सर्वाधिक शेतकऱ्यांकडून बीटी कपाशी बियाणांची मागणी होते. मागील वर्षापर्यंत संकरित कपाशी बीटी बियाणे फक्त खासगी कंपनीकडे उपलब्ध होते. परंतु, यंदा बियाणे महामंडळाकडून एनएचएच -४४ व पीकेव्ही -२ या दोन वाणाची मागणी मोठ्या प्रमाणात होती. यामुळे महाबीजने मागणी लक्षात घेऊन या वर्षी हे दोन वाण बीटीमध्ये उपलब्ध करून दिले. यामुळे नांदेड जिल्ह्यात महाबीजच्या बीटी बियाणे सात हजार ८२८ पॉकिटांची लागवड झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com