वारंवार होणाऱ्या छेडछाडीमुळे प्राध्यापिका बेशुद्ध

Crime
Crime

औरंगाबाद - सहकारी प्राध्यापकाकडून वारंवार होणाऱ्या छेडछाडीमुळे प्राध्यापिका जागीच बेशुद्ध पडल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. तीन) दुपारी विद्यापीठात घडली. या प्राध्यापिकेवर उपचार सुरू असून, संशयिताच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेत कार्यरत असलेली प्राध्यापिका जयसिंगपुरा परिसरात राहते. याच विभागात कार्यरत असलेला प्राध्यापक अझहरोद्दीन तिची छेड काढत होता. त्यामुळे प्राध्यापिकेने कुलगुरूंकडे तक्रार दिली. यावेळी अचानक प्राध्यापिकेचा रक्तदाब वाढला. त्यामुळे बेशुद्ध पडलेल्या प्राध्यापिकेला तत्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी प्राध्यापिकेच्या भावाने बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील प्राध्यापिकेने बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करीत प्रतिबंधात्मक कारवाईही केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com