कटुआ आणि उन्नाव घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चाला बीडमध्ये प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

बीड - जम्मू काश्मिरमधील कटुआ आणि उन्नाव येथील घटनेचा निषेध आणि या प्रकरणांतील आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी मंगळवारी बीडमध्ये निघालेल्या सर्वपक्षीय मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. 

किल्ला मैदान येथून निघालेला मोर्चा कारंजा, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. काळ्या फिती बांधून मोर्चात अनेकांनी सहभाग घेतला. राजकीय पक्ष आणि विविध संघटनांसह मराठा क्रांती मोर्चानेही या मोर्चात सहभाग घेतला. महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. 

दरम्यान, मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचल्यानंतर महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मोर्चाच्या समारोपावेळी मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी परिसर दणानून गेला. नराधमांना फाशी द्या, मुलींचे रक्षण करा यश सरकार आणि व्यवस्थेच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही घोषणांतून लक्ष्य करण्यात आले.

'बेटी बचाओ नारा'
मोर्चामध्ये 'जस्टीस फॉर वूमेन', 'जस्टीस फॉर असिफा', 'बचेगी बेटी तो पढेगी बेटी', 'बस करो नारी पे वार' 'कहा है पाखंडी चौकीदार' यासह 'बेटी बाचाओ' असे विविध प्रकारच्या घोषणांचे फलक हाती घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले. 

Web Title: Protest against kathua unnav Response to the All-party Front Bead