धनगर समाजाचे शेळ्या मेंढ्यासह आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

नांदेड : धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने जांब (ता. मुखेड)  येथे धनगर समाजाच्या आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी चक्का जाम आंदोलन सोमवारी (ता.13) उस्फूर्त प्रतिसादात सुरू असून या आंदोलनात धनगर समाजबांधव शेळी मेंढयांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दरम्यान विविध संघटना व पक्षांनी या बेमुदत आंदोलनास पाठींबा दिला आहे.

सोमवारी सकाळी जांब सह आजूबाजूच्या  गावातील ग्रामस्थांनी तसेच आंदोलन समितीच्या पदाधिकारी यांनी युवावर्गासह आंदोलनस्थळी जमन्यास सुरवात केली आहे. धनगर समाजास आरक्षण मिळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. याबाबत सरकारने चालढकल केल्यास धनगर समाजास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यास भाग पडल्यास पुढील घटनेस सर्वस्वी जबाबदारी सरकारवर राहिल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: protest with Dhangar community goats sheep