कर्जमाफीची मागणी करत मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

कर्जमाफीची मागणी करत युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज (शनिवार) सकाळी उस्मानाबाद जिल्ह्यातील दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले.

उस्मानाबाद : कर्जमाफीची मागणी करत युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज (शनिवार) सकाळी उस्मानाबाद जिल्ह्यातील दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले.

जलयुक्त शिवार कामाची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज वाशी तालुक्‍यातील पार्डी येथे आले होते. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास फडणवीस शेततळ्याची पाहणी करत असताना युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते अचानकपणे समोर आले आणि त्यांनी कर्जमुक्तीच्या घोषणा देत काळे झेंडे दाखवले. या प्रकरणी पोलिसांनी युवक कॉंग्रेसच्या सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारानंतर फडणवीस भूम तालुक्‍यातील हिवरा येथे रवाना झाले.

Web Title: Protest by youth congress in front of CM