Maratha Reservation : दुसऱ्या ठिय्या आंदोलनाचा परळीत दुसरा दिवस

protests begin in Parali Vaijanath for Maratha Reservation
protests begin in Parali Vaijanath for Maratha Reservation

परळी वैजनाथ : राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चांनंतर मराठा आरक्षण मागणीचा हुंकार राज्यभर पेटविणाऱ्या परळीत दुसऱ्यांदा ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. सोमवारी (ता. २६) आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील नागापूर ग्रामस्थांनी सहभाग घेतला. तर, मंगळवारी (ता. २७) वानटाकळी ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. 

मराठा आरक्षण मागणीसह समाजाच्या इतर मागण्यांसाठी परळीत जुलै - ऑगस्ट महिन्यात तब्बल २१ दिवस ठिय्या आंदोलन झाले. आंदोलनादरम्यान प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नसल्याचा आरोप व या मागण्यांची पूर्तता करण्याच्या मागणीसाठी रविवार (ता. २५) पासून पुन्हा तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु झाले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देताना पूर्वीप्रमाणे दिशाभूल न करता ठोस आणि कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींला फाशीची शिक्षा द्यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या नावांमध्ये मराठा नावाचा उल्लेख करावा, कर्ज वितरणाची प्रक्रिया सुलभ व सुटसुटीत करून बँकांना कर्जवितरण सक्तीचे करावे, मागील आंदोलनात आरक्षण मागणीसाठी शहीद झालेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत करावी, आरक्षण मागणी आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

दरम्यान, आंदोलनात पहिल्या प्रमाणे रोज एक गावाचा सहभाग सुरु झाला असून त्या प्रमाणे सोमवारी नागापूर ग्रामस्थांनी या ठिय्यात सहभाग घेतला असून मंगळवारी वानटाकळी ग्रामस्थांनी सहभाग घेतला. सोमवारी आंदोलनस्थळी मंडपही उभारण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com