पालमचा जवान जम्मु काश्मीरमध्ये हुतात्मा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

शस्त्रसंधीच्या उल्लंघनात भारतीय सैन्यातील एक जवान हुतात्मा झाला.

परभणी - जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी येथे सीमा रेषेवर पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात भारतीय सैन्यातील एक जवान हुतात्मा झाला. शुभम मुस्तापुरे असे या जवानाचे असून ते कोनरेवाडी (ता. पालम, जि. परभणी) गावचे रहिवासी होते. 

सीमा रेषेवर पाकिस्तानने मंगळवारी (ता. 3) सकाळी कृष्णा घाटी येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकच्या गोळीबारात सैन्यातील जवान शुभम सुर्यकांत मस्तपुरे हे हुतात्मा झाले. हुतात्मा शुभम मुस्तापूरे यांच्या पश्चात आई - वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव बुधवारी (ता. 4) सकाळी त्यांचे मुळ गाव कोनेरवाडी (ता.पालम) येथे आणण्यात येईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

 

Web Title: Psalms soldier Shubham Mastapure martyr in Jammu Kashmir