सरदारवाडीतील शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

कासार सिरसी - सरदारवाडी (ता. निलंगा) येथील अल्पभूधारक शेतकारी बाबूराव चापाले यांचा मुलगा नवनाथ चापाले हा फौजदार झाला आहे. नवनाथचे प्राथमिक शिक्षण सरदारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. अकरावी ते बीएपर्यंत शिक्षण श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे झाले. डीएड भुसणी (जि. लातूर) येथे झाले. यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उतीर्ण होऊन नवनाथ फौजदार बनला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द व चिकाटीने हे यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल नवनाथ यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.

कासार सिरसी - सरदारवाडी (ता. निलंगा) येथील अल्पभूधारक शेतकारी बाबूराव चापाले यांचा मुलगा नवनाथ चापाले हा फौजदार झाला आहे. नवनाथचे प्राथमिक शिक्षण सरदारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. अकरावी ते बीएपर्यंत शिक्षण श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे झाले. डीएड भुसणी (जि. लातूर) येथे झाले. यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उतीर्ण होऊन नवनाथ फौजदार बनला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द व चिकाटीने हे यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल नवनाथ यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. या वेळी माजी सैनिक सुरेश डावरगावे, मुख्याध्यापक प्रताप कावाले, नितीन पाटील, संदीप मोरे, बालाजी मोरे, अमोल पाटील, मारुती लोहार, रसूल पटेल, रंजित मोरे, लक्ष्मण चापाले, दत्तात्रय चापाले, शीतल चापाले, वाल्मीक बुग्गे, अमर तुमकुटेसह आदी उपस्थित होते.

आई-वडिलांचे आशीर्वाद, गुरुजींचे मार्गदर्शन व माझ्या भावांची मेहनत व माझी जिद्द यामुळेच मला हे यश प्राप्त झाले आहे. 
- नवनाथ चापाले

Web Title: PSI became the son of a Sardarwadi farmer Motivation