भांडणे सोडविण्यासाठी गेले अन् फौजदारच झाले जखमी

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 4 जून 2018

मेव्हणा व भाऊजीमध्ये सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गस्तीवर असलेले भाग्यनगर ठाण्याचे एक फौजदार जखमी झाले आहेत. ही घटना भाग्यनगर परिसरात रविवारी (ता.3) रात्री अकरा वाजता घडली. या प्रकरणी विमानतळ ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड - मेव्हणा व भाऊजीमध्ये सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गस्तीवर असलेले भाग्यनगर ठाण्याचे एक फौजदार जखमी झाले आहेत. ही घटना भाग्यनगर परिसरात रविवारी (ता.3) रात्री अकरा वाजता घडली. या प्रकरणी विमानतळ ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भाग्यनगर परिसरात एका हॉटेलवर चहा घेत असतांना भाऊजी व मेव्हणा यांच्यात वाद झाला. माझ्या बहिणीला का नांदावयास नेत नाही असे म्हणून भाऊजीला मारहाण केली. यावेळी रागाच्या भरात चहा भरलेली किटली सदाशिव किरकण रा. शंखतिर्थ (ता. मुदखेड) याने अवधूत खानसोडे रा. वासरी (ता. मुदखेड) यांना मारली. यात ते गरम चहामुळे भाजल्या गेले. त्यानंतर खंजरने वार केले. 

हा प्रकार सुरू असतांना भाग्यनगर ठाण्याचे फौजदार चित्तरंजन ढेमकेवाड हे आपल्या पथकासह रात्रीची गस्त घालत होते. वाद सुरू असल्याने ते त्या ठिकाणी गेले. वाद सोडवित असतांना आरोपी सदाशिव किरकण याने त्यांच्यावरच खंजरने हल्ला केला. यात त्यांच्या हाताच्या बोटाला जबर दुखापत झाली.

 

Web Title: PSI were injured in fight

टॅग्स