जनता आणि पोलिसांत असावी समन्वयाची भूमिका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

माजलगाव - गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जनता आणि पोलिसांचा समन्वय असावा, असे प्रतिपादन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांनी येथे केले. 

माजलगाव - गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जनता आणि पोलिसांचा समन्वय असावा, असे प्रतिपादन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांनी येथे केले. 

शहर पोलिस ठाण्यातील विश्रांतिगृह व दामिनी पथकाचे उद्‌घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 30) करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, सहायक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. हरी बालाजी एन., पोलिस निरीक्षक हेमंत मानकर, पोलिस निरीक्षक सुरेश चाटे, पोलिस उपनिरीक्षक विकास दांडे, प्रियंका फंड यांची उपस्थिती होती. या वेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले की, पोलिस सतर्कतेने कामगिरी बजावत असताना समाजाचे बहुमोल सहकार्य मिळते. यामुळेच काम करणे शक्‍य होते. मुलींच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी दामिनी पथक कार्यान्वित करण्यात आले असून मुलींच्या छेडछाडीचे प्रकार होत असल्यास तत्काळ या पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. गैरकृत्य करणाऱ्यांना चोप देण्यात येईल, त्यांची गय केली जाणार नाही, पोलिस प्रशासनाचे गुन्हेगारीचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी जागरूक नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरालगतच असणाऱ्या अकरा पुनर्वसित गावांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या ठिकाणी पोलिस चौकी उभारावी अशी मागणी माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी निवेदनाद्वारे श्री. पाटील यांच्याकडे केली. 

Web Title: The public and the police should be the role of coordination