दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

औरंगाबाद - न्यायनगर आणि पुंडलिकनगरच्या या दोन वॉर्डांच्या सीमेवर असलेल्या पुंडलिकनगरमधील गल्ली नंबर एक आणि न्यायनगरातील चोंडेश्‍वरी हौसिंग सोसायटीतील नागरिकांना दूषित पाण्याचा गेल्या पंधरा दिवसांपासून पुरवठा होत आहे. तक्रार करूनही पालिका लक्ष देत नसल्याने गुरुवारी येथील नागरिकांनी सभागृहनेत्यांना घेराओ घालत संताप व्यक्त केला.

महापालिकेतील सभागृहनेते गजानन मनगटे यांच्या वॉर्डातच नागरिकांना मागील पंधरा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळाद्वारे चक्क ड्रेनेजचे पाणी येत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. न्यायनगर आणि पुंडलिकनगरच्या या दोन वॉर्डांच्या सीमेवर असलेल्या पुंडलिकनगरमधील गल्ली नंबर एक आणि न्यायनगरातील चोंडेश्‍वरी हौसिंग सोसायटीतील नागरिकांना दूषित पाण्याचा गेल्या पंधरा दिवसांपासून पुरवठा होत आहे.

येथील ड्रेनेजलाईन खराब झाल्याने चेंबर तुडुंब भरले आहे. हेच ड्रेनेजचे पाणी नळाच्या पाईपलाईनमध्ये मिश्रित होऊन नळाद्वारे येत असल्याचा नागरिकांचा दावा आहे. त्यांच्या सांगण्यानुसार या भागात ड्रेनेज व पाण्याची पाईपलाईन 20 वर्षांपूर्वी टाकण्यात आली आहे. आता ती जीर्ण झाली आहे. तक्रार करूनही पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ही समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्याने गुरुवारी संतप्त नागरिकांनी सभागृहनेते गजानन मनगटे यांना बोलावून घेतले. मनगटे येताच नागरिकांनी त्यांना घेराओ घालत या भागात रस्ते, जलवाहिनी व ड्रेनेजलाईन नव्याने टाकण्याची मागणी केली.

Web Title: public disturb by uncleaned water supply