सरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद) यांचे मंगळवारी (ता.१६) पहाटे साडे चार वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. 

मनमिळाऊ स्वभावाचे ऍड पांडे यांनी 1998-2000 दरम्यान वकिलीची सुरवात केली होती. औरंगाबाद जिल्हा वकील संघाच्या क्रिकेट संघाची बांधणी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात अॅड पांडे यांचा मोठा वाटा होते. वकीलाबरोबरच उत्कृष्ट क्रिक्रेटपटू म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळविला होता. जिल्हा वकील संघाला त्यांनी राज्य स्तरावर उपविजेतेपद मिळवून दिले होते. त्यांनतर वेस्ट इंडिज येथे पार पडलेल्या आतंरराष्ट्रीय स्तरावर क्रिक्रेट खेळण्यासाठी त्यांना संधी मिळाली होती. तीन ते चार वर्षांपासून ते सरकारी वकील म्हणून काम पाहत होते.

Web Title: Public prosecutor Uday Pandey passes away