आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ओझे  आमच्या खांद्यावर टाकू नका : महेश एलकुंचवार

औरंगाबाद ः प्रवीण बर्दापूरकर यांच्या पुस्तकांचे शनिवारी प्रकाशन करताना (डावीकडून) अंकुशराव कदम, सुधीर रसाळ, महेश एलकुंचवार, नरेंद्र चपळगावकर, श्री. बर्दापूरकर.
औरंगाबाद ः प्रवीण बर्दापूरकर यांच्या पुस्तकांचे शनिवारी प्रकाशन करताना (डावीकडून) अंकुशराव कदम, सुधीर रसाळ, महेश एलकुंचवार, नरेंद्र चपळगावकर, श्री. बर्दापूरकर.

औरंगाबाद - "विदेशांतील चारदोन विद्यापीठांत नाटकांचे प्रयोग झाले, म्हणून कुणी आंतरराष्ट्रीय नाटककार होत नाही. रवींद्रनाथ टागोर हे खरे आंतरराष्ट्रीय नाटककार. बाकीच्यांनी आमच्या खांद्यावर आंतरराष्ट्रीयतेचे ओझे टाकू नका", अशी स्पष्टोक्ती नाटककार महेश एलकुंचवार यांनी केली. सुमारीकरणाच्या काळात मराठी माणसांनी तारतम्य बाळगून उपमा दिल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. 

ज्येष्ठ पत्रकार, लेखक प्रवीण बर्दापूरकर लिखित 'डायरी', 'क्‍लोज-अप' आणि संपादित 'माध्यमातील ती' या तीन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ शनिवारी (ता. नऊ) महात्मा गांधी मिशनच्या चित्रपती व्ही. शांताराम सभागृहात झाला. व्यासपीठावर समीक्षक डॉ. सुधीर रसाळ, निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम आणि मंगला बर्दापूरकर होते. 


श्री. बर्दापूरकर यांनी प्रास्ताविकातून आपल्या लेखन प्रवासाबद्दल सांगितले. "माझ्याकडे सांगण्यासारखे भरपूर आहे. ते लिखाण काहींना आवडते, काहींना नाही; पण पत्रकारितेच्या निमित्ताने जगभर प्रवास केल्यानंतर अनुभवांती जे गवसले, ते सांगण्याचा प्रयत्न असतो,'' असे ते म्हणाले. 

लेखकाचे व्यक्तिमत्त्व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याच्या लेखनात उतरते. त्यामुळे त्याला लालित्य प्राप्त होते. असे लेखन सामाजिक इतिहासाचा दस्तावेज असते. पत्रकारांनी कायम अशा प्रकारचे लेखन केले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. रसाळ यांनी व्यक्त केली. अंकुशराव कदम, न्या. चपळगावकर यांनीही शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन श्रीकांत उमरीकर यांनी केले. आभार डॉ. मिलिंद देशपांडे यांनी मानले. 
 

चारित्र्यभंजन आणि चारित्र्यपूजन 
चारित्र्यभंजन किंवा चारित्र्यपूजन याच व्यक्तिचित्रणाच्या मोठ्या मर्यादा असतात. एखादा माणूस कुणाला पूर्णपणे कळणे अशक्‍य असते. आपण आपल्या चष्म्यातून त्यांना पाहिलेले असते. आपले ग्रह, समजुती आणि आकलन व्यक्तिचित्रणाला चिकटलेले असते, असेही एलकुंचवार यांनी नमूद केले. 
 
तुम्ही लिहिता, हेच महत्त्वाचे 
कुठल्याही लेखकाने आपण लिहितो हे सामान्य आहे, असे म्हणू, समजू नये. सृजनाचा आनंद सृजनातच असतो. आपले लिखाण चांगले असेल की नसेल, असे ओशाळवाणे विचार करू नयेत. चांगले असेल तर टिकेल. नाही तर तात्कालिक आनंद काही लोकांना तरी त्या लेखनाने दिलेला असतो, असे सांगत एलकुंचवारांनी नवलेखकांना बळ दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com